Home Blog Page 31

सरकार स्थिरतेच्या सुप्रीम निकालासाठी श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात संकल्पपूर्ती व महाआरतीचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विद्यमान सरकार व शिवसेने संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सकारात्मक निर्णयानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव पंढरीनाथ पाटील यांनी केलेल्या संकल्पानुसार आज शुक्रवारी प्राचीन तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे संकल्पपूर्ती अभिषेक तसेच एका भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.+

यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, शिवसेना जिल्हा संघटक, माजी नगरसेवक तथा कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील, कल्याण ग्रामीण सचिव बंडू पाटील, श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहन पाटील, उपसचिव अरुण पाटील, उपाध्यक्ष रतन म्हात्रे, सदस्य सुरेश पाटील, कल्याण तालुका संघटक अर्जुन पाटील, शिवसेना डोंबिवली उपशहर प्रमुख सुनील भोसले, उपशहर संघटक संतोष तळाशीकर, विभाग प्रमुख अमोल पाटील, उप-कार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे, माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, प्रकाश माने, युवा सेनेचे जिल्हा पदाधिकारी योगेश म्हात्रे, रवी मट्या पाटील, रवी अंबो म्हात्रे, दिपाली स्वप्निल पाटील, उमेश पाटील, विभाग प्रमुख अनिल म्हात्रे, सचिन म्हात्रे, ऍड. स्वप्निल पंढरी पाटील, डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक बंधू भगिनी श्रद्धापूर्वक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे जागृत देवस्थान आहे. याचा सहा वेळा मला अनुभव आला होता. यंदा देखील मी केलेल्या संकल्पनुसार माझी इच्छा पूर्ण केली. म्हणून मी अभिषेकाचे आणि शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन केले होते असे पंढरीनाथ पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसैनिकांचा जल्लोष..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा गुरूवारी एकदाचा सोक्षमोक्ष लागलाच. सुप्रीम कोर्टाने निकाल जाहिर केल्यानंतर कल्याण-डोंबिवलीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करुन, पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

बुधवारपासून सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार धोक्याच्या उंबरठ्यावर उभे असल्याची, तसेच सरकार गडगडण्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिंदे समर्थक शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. गुरूवारी दुपारी सुप्रीम कोर्टाने निकाल जाहिर केल्यानंतर अस्वस्थ शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील सरकार स्थिर असल्याचे जाहीर होताच डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत जमलेल्या शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. शहरप्रमुख राजेश मोरे, संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, सुनील मालणकर, आदी पदाधिकाऱ्यांसह शिंदे समर्थक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयासह “जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, आदी समर्थनाच्या घोषणा देऊन शिवसैनिकांकडून परिसर दणाणून सोडण्यात आला.

 

डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे प्रकाश म्हात्रे यांचा अध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेकडील सागांव भागातील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. मागील १२ वर्ष ते विश्वस्तांच्या सहकार्याने ट्रस्टचा कारभार पाहत आहेत. अध्यक्ष पदाच्या पाच वर्षामधील तीन वर्षाचा कालावधी शिल्लक असताना त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय दबाव तंत्राने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा भक्तगणांमध्ये सुरू आहे.

शिवसेना एकसंध असताना प्रकाश म्हात्रे यांनी कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य अशी अनेक पदे उपभोगली आहेत. कल्याण ग्रामीण शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा कारभार इतर विश्वस्तांच्या सहकार्याने त्यांनी १२ वर्ष सांभाळला. अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम मंदिराच्या माध्यमातून राबविण्यासाठी ते आघाडीवर होते. शिवसेनेचा कल्याण ग्रामीण मधील उमेदवार निवडून आणण्याचे नियोजन त्यांच्याकडे असायचे. शांत, संयमित आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर प्रकाश म्हात्रे आणि त्यांच्या काही समर्थकांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सोबत राहणे पसंत केले. म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटात दाखल व्हावे म्हणून विविध प्रकारची आयुधे, दबावतंत्र शिंदे समर्थकांकडून वापरण्यात आली. गेल्या नऊ महिन्याच्या कालावधीत कोणत्याही दबावतंत्राला बळी न पडता. आमची निष्ठा शिवसेनाप्रमुखांच्याच चरणी, या बाण्याने प्रकाश म्हात्रे आणि समर्थक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समवेत आहेत. या गोष्टीची चिड शिंदे समर्थकांना आहे. त्यामुळे म्हात्रे यांच्या मार्गात जेवढे अडथळे आणता येतील असे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. या अडथळ्यांमधून होणाऱ्या त्रासातून मुक्त राहण्यासाठी प्रकाश म्हात्रे यांनी ‘श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट’ अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू आहे.

मंदिर ट्रस्टवर ११ सदस्य आहेत. त्यामध्ये शिंदे समर्थक तीन सदस्य आहेत. प्रकाश म्हात्रे हे स्वतः उद्धव ठाकरे समर्थक असल्याने मंदिरा संदर्भातील काही विकास कामे मार्गी लावताना आपण शिंदे गटात प्रवेश करत नसल्याने अडथळे येत असल्याची जाणीव म्हात्रे यांना होत होती. आपण शिंदे गटात जाणार नाही या विषयावर म्हात्रे ठाम आहेत. मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी असल्याने आपला अध्यक्ष पदाचा अडसर मंदिराच्या विकास कामात नको म्हणून म्हात्रे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा इतर विश्वस्त, भक्तगणांमध्ये सुरू आहे. प्रकाश म्हात्रे हे राजीनाम्याविषयी विस्तृत बोलत जरी नसले तरी, राजकीय दबाव हेच त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्या मागील मुख्य कारण असल्याच्या चर्चेला उधाण आहे. कल्याणमध्ये ठाकरे समर्थक जिल्हाप्रमुख विजय साळवी, डोंबिवलीत जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, माजी आमदार सुभाष भोईर असे जुने मोहरे एकनाथ शिंदे यांच्या गटात यावेत यासाठी विविध प्रकारच्या खेळी प्रतिस्पर्ध्यांकडून सुरू असल्याचे कळते. “श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराची १२ वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. विश्वस्त, भक्तगणांची चांगली साथ मिळाली. व्यक्तिगत कारणामुळे आपण राजीनामा दिला आहे.” असे शिवसैनिक उद्धव ठाकरे समर्थक प्रकाश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

मणिपूर दंगलीत अडकलेले २५ विद्यार्थी महाराष्ट्रात सुखरूप परत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काल चर्चा केली होती, त्यानंतर आज सकाळी या विद्यार्थ्यांना इंफाळहून आसामच्या गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले. त्यानंतर आज रात्री विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, राजशिष्टाचार अधिकारी अब्दुल अजीज बेग आणि त्यांच्या टीमने शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सुखरूप परतल्याबद्दल विद्यार्थ्यांनीदेखील राज्य शासनाचे आभार मानले.

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या परिस्थितीत अडकले असल्याचे समजताच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. याचबरोबरच मुख्यमंत्र्यांनी तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तसेच त्यांना विशेष विमानाने आसाममार्गे महाराष्ट्रात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार आज हे विद्यार्थी सुखरूप परतले आहेत.

विद्यार्थ्यांनी मानले महाराष्ट्र शासनाचे आभार

मणिपूर येथील दंगलीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई येथे सुखरूप परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन प्रयत्न केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

सुखरूप परत आलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :

आदित्य गजभिये, तुषार आव्हाड, आयुष दुबे, शिवसंपत तागिरीसा, गौतम चौरसिया, साजन पौणिकर, मोहित खडपे, भूषण पावरा, वृक्षाल गणवीर, विकास शर्मा, तन्मय मादव, मडिकोंडा अविनाश, रोहित कोरी, आयुष रवी, ज्ञानदीप छुटे, प्रतिक कोडग, पुनर्वसू इंगोले, साईजित निकम, अनन्य बॅनर्जी, शंतनू कुंभीरकर, क्रिश कलगुडे, फाल्गुन महाजन, मधुरिका इंदूरकर, रोनिल नाडर आणि अश्वगंधा पराडे.

 

माजी स्थायी समिती सभापतींनी ‘अमृत योजने’ अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण भागातील कामाचा घेतला आढावा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण ग्रामीण भागात माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आज केडीएमसी अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. या भागात असलेल्या पाणीटंचाईची समस्या देखील जाणून घेतली. या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उद्या पालिका आयुक्तांसमवेत बैठक घेणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश मात्रे यांनी आज पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत कल्याण ग्रामीण मधील गोळवली, दावडी , सोनारपाडा व मानपाडा या गावांमध्ये अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. या अमृत योजनेअंतर्गत प्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र जलकुंभ बांधून देण्यात येणार आहे जेणेकरून भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. सध्या या चारही विभागात पाणी कमी प्रमाणात देण्यात येत आहे, यावरही तोडगा काढण्याकरिता उद्या महापालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित केल्याची माहिती दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

सदर भागातील पाण्याचा प्रश्न येत्या चार महिन्यात सोडविण्यात येईल अशी ग्वाही संबंधित ठेकेदाराने दिली. यावेळी माजी नगरसेवक जालींदर पाटील, नकुल गायकर, मुकेश पाटील पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी, योगेश म्हात्रे, आशु सिंह, मुकेश भोईर, स्वप्निल विटकर, पवन म्हात्रे, अक्षय गायकर, सचीन कासार व ग्रामस्थ उपस्थित होते.