Home Blog Page 5

*आंतरराष्ट्रीय तलवारबाजी पट्टू साईप्रसाद जंगवाड यांचा यशवंत विद्यालयात सत्कार संपन्न*

अहमदपूर :-
मासूम शेख

येथील यशवंत विद्यालयात दहावी मध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी साईप्रसाद संग्राम जंगवाड यांनी यावर्षी चार राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत, तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत, जागतिक पातळीवर सहभाग नोंदवला.
न्यूझीलंड येथील कॉमनवेलथ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळविले. त्याबद्दल 2023 24 यावर्षीचा लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा समिती मार्फत त्याला गुणवंत क्रीडा पुरस्कार नुकताच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लातूरचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले आणि जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत त्यांना लातूर येथे शासकीय ध्वजारोहणाच्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी यांच्या हस्ते शालेय प्रार्थनेमध्ये साईप्रसाद जंगवाड यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
साईप्रसाद जंगवाड याला विभाग प्रमुख संतोष कदम, दीपक हिंगणे, प्रभावती मिरजकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
या यशाबद्दल त्यांचे डॉ. अशोकराव सांगवीकर, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, सहसचिव डॉक्टर सुनिता चवळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. दत्ताभाऊ गलाले, प्राचार्य गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

*विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त आणि मेहनतीवर जीवन घडवावे* *पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन* *यशवंत विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा*

अहमदपूर:-
मासूम शेख

प्रचंड स्पर्धेच्या जगात जीवनात नेत्रदीपक यश प्राप्त करण्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी सातत्याने स्वयसिस्त, संयम आणि प्रचंड मेहनतीवर आपले उज्वल भवितव्य घडवावे असे आग्रही प्रतिपादन यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांनी केले.
ते यशवंत विद्यालयात स्वयंशासन दिनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य गजानन शिंदे, व्यासपीठावर पर्यवेक्षक
शिवाजी सूर्यवंशी, स्वंयशासन दिनाच्या मुख्याध्यापिका साधना बैकरे, उप मुख्याध्यापक ज्ञानदा दाचावार, सोहम देशमुख, पर्यवेक्षक राही डावळे, साईराज मुंडे, गहिनीनाथ क्षिरसागर, विभाग प्रमुख आर व्ही पाटील, डॉ. शरद करकनाळे यांच्यासह यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी गहिनीनाथ क्षिरसागर, सृष्टी बेरळकर, सोहम देशमुख, साधना बैकरे यांचे मनोगत पर भाषणे झाले.
प्राचार्य गजानन शिंदे यांच्या भाषणाने अध्यक्षीय समारोप करण्यात आला.
प्रास्ताविक आर व्ही पाटील यांनी केले सूत्रसंचालन डॉ. शरद करकनाळे यांनी तर आभार धनंजय तोकले यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

*उच्चशिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे एक साधन*…. … प्रा बालाजी आचार्य *वाघंबर परिवाराच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त महिलांना कपडे वाटप*

अहमदपूर:-
मासूम शेख

उच्च शिक्षण हे बुध्दीजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातील दुर्बल, मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळायला पाहिजे उच्च शिक्षणातूनच समाजाची प्रगती होते उच्चशिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे असे प्रतिपादन अहमदपूर येथील कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर याच्या परिवाराने महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या औचित्याने गोर गरीब महिलांना कपडे वाटप डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्याते प्रा बालाजी आचार्य यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी शिवानंद हेगणे तर उद्घघाटक सामाजिक युवक नेते डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी , उद्योजक प्रकाश फुलारी तर प्रमुख मार्गदर्शक प्रा बालाजी आचार्य प्रमुख पाहुणे आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते गोपीनाथ जोंधळे , आर. जी. कांबळे, ग्रामसेवक किनगाव, प्रा. बाबासाहेब वाघमारे, आशिष तोगरे, अजहर बागवान, नीलकांत पाटील, राहुल शिवपुजे, मुसाभाई तांबोळी न.प., स्वरूप चिर्के, माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे, वसंतराव आचार्य, सुरेखाताई आचार्य, प्रकाश राठोड, डी बी कांबळे, आचल ओस्तवाल, गणेश मदने, हुसेन मणियार, भांगे सर, मुख्याधिपिका दर्शना हेंगणे मा नगरसेविका शाहूताई कांबळे शिक्षक पत संस्थेचे चेअरमन सुजीत गायकवाड, शेख अफरोज भाई, तलाठी महेश गुपिले,बिराजदार साहेब, कांताबाई आचार्य, शकुंतलाबाई बनसोडे आदि उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे उद्घघाटन महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली यानंतर अंजलीताई वाघंबर या प्रस्ताविकपर भाषणात म्हणाल्या की
कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या संकल्पनेतून गेल्या ३४ वर्षापासून महिलांना कपडे वाटप व तिळगुळ देऊन शुभेच्छा कार्यक्रम या सामाजिक उपक्रमांची सुरुवात माझे सासरे भाऊसाहेब वाघम्बर यांनी केली त्यांचा वारसा आम्ही माझे पती अरुण वाघम्बर हे आणि मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा कार्यक्रम असाच चालू ठेवणार आहोत असे आपल्या प्रास्ताविक पर भाषणात अंजली वाघमारे या म्हणाल्या. या कार्यक्रमात पुढे बोलताना प्रा आचार्य यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचा इतिहास सविस्तर मांडला आणि या नामांतर लढ्यात कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांचे फार मोठे योगदान होते त्यांनी नामांतरासाठी मोठा लढा लातूर जिल्ह्यात उभा केला होता त्यांनी नामांतर लढ्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर, अहमदपूर येथे जेल भोगली असून त्यांचे खूप मोठे योगदान नामांतरासाठी आहे असे प्राध्यापक आचार्य सर आपल्या भाषणात म्हणाले. तत्पूर्वी सुजित गायकवाड, आणि डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी यांनी कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांचा सामाजिक उपक्रमाचा वारसा पुढे चालवत असल्याबद्दल अरुण भाऊसाहेब वाघंबर, परिवाराचे कौतुक केले. यानंतर शिवानंद हेगणे यांनी सर्वाचे कौतुक करत कर्तुत्ववान कर्मवीर भाऊसाहेब , अरुणभाऊ आणि अंजलीताई यांना साथ देऊन त्यांच्या फाऊडेशन ला मदत करण्याचे आश्वासन दिले यानंतर या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्व 485 महिलांना साडी -चोळी कपड्याचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक, निमंत्रक- अरुण भाऊसाहेब वाघंबर माधव झुबरे, बालाजी भोगे, आदित्य वाघंबर, चेतन लामतुरे, रितेश वाघम्बर, राजकुमार आचार्य,शुभम वाघम्बर, आकाश व्यवहारे, विकास व्यवहारे, अनिल वाघमारे, डॉन वाघमारे, सुशील आचार्य, तेजस बनसोडे, सौ अंजली वाघंबर, अश्विनी वाघंबर, दैवशाला वाघम्बर, कांताबाई आचार्य ,रसिका बनसोडे, इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला त्यानंतर या कार्यक्रमात संध्याकाळी भीमशाहिर यादव परतवाय , सुभाष साबळे यांच्या परिवर्तनवादी भीमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केले तर आभार माधव झुबरे यांनी सर्वांचे मानले..

*राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न* *राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती उत्सव समिती महाराष्ट्र राज्य, शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, अखिल महाराष्ट्र शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले रक्तदान शिबिर*

अहमदपूर :- मासूम शेख

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती अहमदपूर तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अहमदपुर तसेच आखिल महाराष्ट्र शिक्षक संघ अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, याप्रसंगी उद्घाटक डॉ.ऋषिकेश पाटील तसेच अध्यक्ष डॉ अमृतजी चिवडे व प्रमुख पाहुणे डॉ संतोष देवकत्ते यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन रक्तदानांची सुरुवात करण्यात आली, सर्वांच्या सहकार्याने आज 182 रक्त संकल संपन्न झाले,
अहमदपूर मध्ये नव्याने सुरुवात झालेल्या शैर्य रक्त पिढी बँक यांच्या रक्त पिढी ला देण्यात आले
याप्रसंगी शिक्षक संघटना
राजेश चिलकरवार सर,संकेत गिरी सर ,संदीप कोटापल्ले सर ,अंकुश झुंजरवार सर ,मुजाहिद शेख सर ,गोपाळ गुट्टे सर ,काशिनाथ लांडगे सर,सतिश हलगरे सर,रजनिकांत जाधव सर,राम मुंढे सर,सिद्धेश्वर रोकडे सर,प्रभाकर मिरजगावे सर,
विलास आगलावे सर ,सुशेन पाटील सर ,विठ्ठल सांगविकर सर,हणमंत नागरगोजे सर,दिपक फुलारी सर,नागनाथ कदम सर,ज्ञानेश्वर केंद्रे सर,भानुदास शिंदे सर,सुरेखा मरवले सर,फुलाबाई साके सर,शांता मद्देवाड सर,तुकाराम पलमटे सर,पांडूरंग उगिले सर,नंदकुमार कोनाले सर ,व्यंकट केंद्रे सर,विठ्ठल नायनवाड सर,बालाजी बेंबरे सर
जयंती महोत्सव समिती
स्वामी विवेकानंद मित्र मंडळातील,अँड. स्वप्नील व्हत्ते,आशिष हेंगणे ,लक्ष्मण अलगुले,संदीप चौधरी ,महेश चौधरी ,अँड.गुणाजी भगत , अमोल सज्जनशेट्टी, प्रमोद चौधरी, वैजनाथ हेंगणे ,मधुकर धडे, जनार्धन भालेराव सर, रामप्रसाद आय्या, अजय जगताप,गंगाधर हेंगणे ,शैलेश चौधरी,अजय गादगे , गणेश मेनकुदळे, ऋषी गादगे ,अनंत खानापुरे,कपिल गादगे,अभिमन्यु कदम, अनिल चव्हाण,प्रज्वल बुलबुले, यश चौधरी, नागेश हेगणे, सतीश मद्देवार, वैजनाथ पुणे,
आदी सदस्य उपस्थित होते.

*अहमदपुरात तिसरे जागल मराठी साहित्य संमेलन उत्साहात साजरे* *मराठी साहित्य चळवळीतून आदर्श समाज उभा करावा* *सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

भारतीय संस्कृतीमध्ये मराठी साहित्याला अनन्य साधारण असे महत्त्व असून मराठी साहित्यामुळे जीवन जगण्याला प्रेरणा, आधार आणि दिशा मिळते त्यामुळे सर्वांनी मराठी साहित्याचा आस्वाद घेऊन मराठी साहित्य चळवळीतून आदर्श समाज उभा करावा असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
ते मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूर च्या वतीने आयोजित तिसरे जागल मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
जागल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर, व्यासपीठावर मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ.दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, सहकार्यवाह डॉ. गणेश मोहिते, म.सा.प. शाखेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, उपाध्यक्ष उदयकुमार जोशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की साहित्यातून शेती, आरोग्य, कला, क्रीडा क्षेत्रात मोठे बदल करून ग्रामीण भागात सहकार चळवळ अग्र क्रमाणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, मराठीला खूप जुनी परंपरा असल्याचे सांगून मराठी भाषा ग्रामीण आणि शहरी भागात रुजवायची असेल तर प्रामाणिकपणे मराठी भाषेचा चिकित्सकपणे अभ्यास करावा.असे जाहीर आवाहन केले.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. धोंडीराम वाडकर म्हणाले की, माणूस प्रतिकूल परिस्थितीत असला तरी शिक्षणात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम ठेवून अभ्यास केल्यास सर्वसामान्य माणूस असामान्य होतो असे सांगून विविध साहित्याचा अहवाल त्यांनी सादर केला. ग्रामीण संस्कृती आणि परंपरा जीवंत ठेवण्यासाठी लोक साहित्याचा अभ्यास करावा असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात नामदार बाबासाहेब पाटील यांचा कॅबिनेट दर्जाचा सहकार मंत्री म्हणून समावेश झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच मराठवाडा साहित्य परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान नामदार बाबासाहेब पाटील, सत्यनारायण काळे यांच्या हस्ते ग्रंथ, सन्मानाचा फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सत्यनारायण काळे परिचय प्रा.द.मा.माने, सूत्रसंचालन राम तत्तापुरे आणि सौ आशा तत्तापुरे-रोडगे यांनी तर आभार उदय जोशी यांनी मानले.
कार्यक्रमाचा शुभारंभ वृक्षाला पाणी घालून करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदे चे मोहिब कादरी, प्रा. गुरुनाथ चवळे, जिलानी शेख गंगाधर याचवाड,अनिल फुलारी प्रा. यादव सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.