Home Blog Page 6

*किलीबल नॅशनल स्कूल येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*

अहमदपूर :-
मासूम शेख

तालुक्यातील जवळगा येथील किलबिल नॅशनल स्कूल येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धर्मसिंग यांच्यासह जिजाऊ यांच्या भुमिकेमध्ये शाळेच्या शिक्षिका उज्वला परचंडे, प्रतीक्षा बेंबडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
इयत्ता पहिली वर्गाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या त्यात भाषण गीतगायन समूह नृत्य अशा कार्यक्रमात भाग घेऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शेवटी जिजाऊ यांच्या भूमिकेत असलेल्या उज्वला मॅडम व प्रतीक्षा मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा माने ,उषा पांचाळ यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*राजमाता जिजाऊंनी शिवबांना स्वराज्याची प्रेरणा दिली—- डॉ. संतोष पाटील*

अहमदपूर:-
मासूम शेख

जगातल्या विद्वानांच्या अभ्यासाचा विषय बनलेल्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये राजमाता जिजाऊंचे मोठे योगदान असून, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची खरी प्रेरणा जिजाऊंनी दिली, असे स्पष्ट प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिजाऊंना आपल्या पूर्वजांकडून मिळालेले संस्कार हे सैनिकाचे होते. तेच संस्कार त्यांनी शिवबावर आणि शिवबांच्या सोबत असलेल्या बाल मावळ्यांवरही केले. शिवबांना स्वराज्याचे बाळकडू जिजाऊंकडून मिळाले. जिजाऊंनी शिवबांना लष्करी शिक्षण दिल्यामुळेच ते स्वराज्य निर्माण करू शकले, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवबांच्या स्वराज्याला आकार दिला तसेच शिवरायांचा राज्यकारभार रयतेसाठी आदर्श ठरावा यासाठीही प्रयत्न केले. तसेच स्वामी विवेकानंदांनी युवकांना ध्येय प्राप्तीसाठी प्रेरणा दिली, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले. प्रास्ताविक ह. भ. प. प्रो.डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले, तर डॉ. सतीश ससाणे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*अहमदपुरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे ‘दक्षिण भारत अभ्यास’ अभियान*

अहमदपूर:-
मासूम शेख

येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने सहल प्रमुख डॉ. किरण गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक भौगोलिक वैभवांसह इतर घटकांचा अभ्यास करण्यासाठी ‘ दक्षिण भारत अभ्यास’ अभियान मोहिमेचा प्रारंभ प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी या अभियानास हिरवा झेंडा दाखवून केला.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखालील शैक्षणिक तसेच समाजोपयोगी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणजे विविधतेने नटलेल्या भारताच्या वैभवाचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी अभ्यास मोहिमेचा प्रारंभ नुकताच करण्यात आला असून या मोहिमेत विजयपूर, बागलकोट, हॉस्पेट , हम्पी , हुबळीसह इतर ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन तेथील ऐतिहासिक भौगोलिक सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा चिकित्सक अभ्यास करण्यात येणार आहे.
या मोहिमेत महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील,उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, सहलीचे नेतृत्व करणारे सहल प्रमुख डॉ. किरण गुट्टे, प्रोफेसर ह.भ.प. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. मारोती कसाब, प्रोफेसर डॉ. नागराज मुळे, डॉ. पांडुरंग चिलगर, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. बी.के. मोरे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापुरे आदींचा समावेश आहे.

*किलीबल नॅशनल स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

अहमदपूर:-
मासूम शेख

तालुक्यातील जवळगा येथील किलबिल नॅशनल स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धर्मसिंग यांच्यासह सावित्रीबाई फुले यांच्या भुमिकेमध्ये शाळेच्या शिक्षिका, अंजली भंडारे, स्वाती कुमठेकर, संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
ज्ञानोबा भोसले पुढे बोलताना म्हणाले, की 18 व्या शतकात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी मोठे कार्य केले. आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्या केवळ फुले दाम्पत्याच्या दूरदृष्टीमुळे. चूल आणि मूल या पारंपरिक चौकटीतून महिलांना बाहेर काढून शिक्षण दिल्याने महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरत आहेत, ही अमूल्य गोष्ट आहे.

*यशवंत विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्सव उत्साहात साजरा* *समाजाने सावित्री ज्योतीचा आदर्श घ्यावा* *पुष्पाताई लोहारे यांचे प्रतिपादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

अनादी काळापासून स्त्रियांना आदिशक्ती मानले जाते. स्त्री ही सृजनशील आणि नवनिर्मितीची प्रणेती आहे म्हणून समाजाने सर्व स्तरातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श घेऊन जीवन दीपस्तंभ प्रमाणे बनवावे असे प्रतिपादन शांतिनिकेतन सहकारी पतसंस्थेच्या माजी अध्यक्षा पुष्पाताई लोहारे यांनी केले .
त्या यशवंत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे हे होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी, खयूम शेख, वर्षा माळी, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा शुभारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजन करून करण्यात आला.
जयंतीचे अवचित साधून पुष्पाताई लोहारे यांच्या वतीने शाळेला चार फूट उंचीची समयी भेट देण्यात आली.
सूत्रसंचालन माही कुलकर्णी, समिक्षा मिटकरी, आरपिता केंद्रे यांनी तर आभार वैष्णवी बनसोडे यांनी मांनले.
यावेळी विद्यालयातील चिमुकल्या मुली सावित्रीबाई फुले, राजमाता जिजामाता, सरस्वती माता, दुर्गा माता, अहिल्यामाता, झाशीची राणी, राधामाता,इंदिरा गांधी, लक्ष्मीच्या हुबे हुब रूप साकार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कपिल बिराजदार, राजेश कजेवाड, श्रीधर लोहारे, बालाजी सोनटक्के शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.