Home Blog Page 7

*एम्स (AIIMS)भोपाळ येथून डॉ .प्रणव तत्तापुरे एम बी बी एस परीक्षा उतीर्ण*

अहमदपूर :-
मासूम शेख

मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळ येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थान, भोपाळ च्या वतीने माहे नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एम बी बी एस च्या फायनल इयरच्या परीक्षेत डॉ. प्रणव रामलिंग तत्तापूरे यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
कालच त्याचा निकाल घोषित करण्यात आला असून त्यामध्ये 1456 गुण घेऊन यशस्वी झाला आहे. पुढील वैद्यकीय प्रशिक्षणासाठी भोपाळच्या एम्स संस्थेत एक वर्षासाठी अधिकृतपणे नेमणूक देण्यात आली आहे.
यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक राम तत्तापुरे आणि संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे तत्तापुरे यांचा चिरंजीव असून अहमदपूर तालुक्यातील तो (AIIMS)एम्स भोपाळ चा पहिला विद्यार्थी आहे.
त्याच्या या नेत्र दीपक यशाबद्दल टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, सचिव तथा प्राचार्या रेखाताई तरडे ,भक्ती स्थळाचे प्रमुख प.पू. आचार्य गुरुराज स्वामी यांच्यासह मित्र परिवारांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

*डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत यशवंत विद्यालयाचे नेत्र दीपक यश*

अहमदपूर
मासूम शेख

टीचर्स असोसिएशन मुंबई यांच्या वतीने डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी होऊन त्यात यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केलेले आहे.
सदरची परीक्षा नववी आणि सहावी इयत्तेसाठी असून नववी मध्ये कुमारी फड वैष्णवी शिवशंकर, वलसे अर्जुन बालाजी, हंगरगे सतेज शंकर यांनी तर सहावीतील आरदवाड आयुष्य अंगद सेकंड लेव्हल साठी पात्र ठरलेले आहेत.
या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे सहशिक्षक अमोल लगड, विवेकानंद हुडे आणि यशवंत कोटा पॅटर्न यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
या चारही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय प्रार्थने मध्ये प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपमुख्याध्यापक माधव वाघमारे ,पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजीराव सूर्यवंशी, कोटा पॅटर्नचे प्रमुख खय्युम शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या नेत्र दीपक यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, सहसचिव प्राध्यापक डॉक्टर सुनिता चवळे यांनी अभिनंदन केले आहे.

236 – अहमदपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व उमेदवार किंवा त्यांचे नेमणुक केलेले प्रतिनिधी यांनी अद्यावत खर्च अभिलेखासह उपस्थित रहावे असे निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे,यांनी केले आवाहन

अहमदपूर :-
मासूम शेख

236 – अहमदपूर विधानसभा मतदार संघातील निवडणुक लढविलेल्या सर्व उमेदवार यांना कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उमेदवाराने प्रत्यक्ष केलेल्या खर्चाच्या लेखापुनर्मळ बैठक निकालाची घोषणा तारखेनंतर 26 व्या दिवशी आयोजित करण्याबाबत निवडणूक खर्च सनियंत्रण या वरील अनुदेशाचा सार संग्रह जानेवारी 2024 मधील जोडपत्र C-10 व भारत निवडणूक आयोग क्र. 76/instructions/EEPS/2015/vol-2 दि. 29- 05-2015 असे निर्देश आहेत त्यानुसार लेखापुनर्मळ बैठक दि. 19/12/2024 वार गुरुवार रोजी सकाळी 11.30 वाजता ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय बार्शी रोड लातूर येथील सभागृहात खर्च निरीक्षक मा. श्री. प्रसंत कुमार काकराला (I.R.S) यांचे अध्यक्षतेखाली उमेदवाराच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लेखापुनर्मळ बाबत बैठक होणार आहे.

तरी 236 – अहमदपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व उमेदवार किंवा त्यांचे नेमणुक केलेले प्रतिनिधी यांनी अद्यावत खर्च अभिलेखासह उपस्थित रहावे असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती. उज्ज्वला पांगरकर व श्री. नरसिंग जाधव तसेच सहाय्यक खर्च निरीक्षक श्री. बी. बी. सपकाळ, नोडल अधिकारी श्री. नागेश बुद्धिवंत व सहायक नोडल अधिकारी श्री. जी. एन. गोपवाड यांनी केले आहे.

*आमदार बाबासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद अहमदपूरात जल्लोष*

अहमदपूर
मासूम शेख

आमदार बाबासाहेब पाटील यांना देवेंद्र फडवणीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जा मिळाल्याने अहमदपूरात एकच जल्लोष करण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या एलईडीवर सदर शपथविधी दाखवण्यात आला त्यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
आमदार बाबासाहेब पाटील यांचे गाव असलेल्या शिरूर ताजबंद येथेही रात्रीच बातमी समजली होती त्यानंतर रात्रीपासूनच जल्लोषास सुरुवात झाली सकाळी शिवाजी चौक येथे कार्यकर्त्यांनी गुलाल व फुलाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला अहमदपूर येथील आनंद उत्सव साजरा करण्यात शिवाजीराव देशमुख, अजहर भाई बागवान, अभय मिरकले ,बाबुभाई रुईकर, चंद्रशेखर भालेराव ,शेख अय्याज भाई ,सुंदर साखरे, महेबूब गुत्तेदार, ईलाही बागवान, बालाजी आगलवे ,मोहम्मद नाजीम भाई ,शरीफ बागवान ,प्रदीप जाधव, पाशाभाई मेजर आदी सह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

*यशवंत विद्यालयात बालसभा उत्साहाच्या वातावरणात संपन्न* *मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी बालसभेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे* *राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

मुलांचा सर्वांगीण विकास प्राथमिक स्तरावरील शिक्षणामध्ये होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेत होणाऱ्या बाल सभेच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा त्यातूनच खरे बाल कलाकार घडतात असे आग्रही प्रतिपादन पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी केले.
ते यशवंत विद्यालयात वर्ग सहावीच्या वतीने आयोजित बाल सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
बाल सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, व्यासपीठावर सह शिक्षक बालाजी सोनटक्के, सह शिक्षक श्रीधर लोहारे, विजयाताई स्वामी, सविता झोळगीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी चिमुकल्या राजनंदनी बनसोडे, आराध्या पाटील, नंदनी नागरगोजे, अहिरीश सय्यद, संध्या कोम्पले या विद्यार्थ्यांनी विविध समाज सुधारकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाले. बाल सभेचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य गजानन शिंदे यांच्या भाषणाने करण्यात आला.
बाल सभेचा शुभारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.
विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी म्हणून ग्रंथ प्रदर्शन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर लोहारे यांनी सूत्रसंचालन सुरभी मुसळे, भक्ती बिराजदार, मानसी गुंडेवाड यांनी तर आभार राधिका डुकरे यांनी मांनले.
बालसभा यशस्वी करण्यासाठी वर्ग सहावीच्या ज्ञानेश्वरी सूर्यवंशी, वैभवी मोरे, समृद्धी गुणाले, प्रतिनिधी सानवी सुडे, मॉनिटर विशाखा प्रिया उगिले आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.