Home Blog Page 8

*आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बांधकाम कामगारांना भांडी किट चे वाटप*

अहमदपूर:-
मासूम शेख

माननीय कार्यसम्राट आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांधकाम कामगार आयुक्त माननीय मंगेश झोले साहेब यांच्या सहकार्याने शिरूर ताजबंद येथील बांधकाम कामगार यांना भांडी किटचे वाटप करण्यात आले.
या शुभप्रसंगी अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व तसेच शिरूर नगरीचे दमदार नेतृत्व मंचक राव पाटील साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या प्रसंगी सभापती मंचकराव पाटील सोबत रजा ऑनलाइन सेंटर चे मालक फरीद रजा, सचिन मुळे, अकबर पठाण, शादुल शेख ,इस्माईल किनीवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

*हाडोळती येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!*

अहमदपूर:-
मासूम शेख

भारतीय संविधानाचे शिल्पकार, आणि समस्त देशवसियांचे प्रेरणास्थान विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त हाडोळती ग्रामपंचायत सदस्य सौ. ज्योती धम्मानंद कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न करून त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.यावेळी उपस्थित अक्षय बोडके (अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती हाडोळती) संग्राम भोगे शादुल शेख धम्मानंद कांबळे भीमाशंकर जाभाडे, हिराचंद कांबळे भगवान साळवे सुरेखा मारकोळे नीता मंजुळाबाई कांबळे अरविंद कांबळे नरसिग कांबळे अरुण साळवे आशिष कांबळे विशाल मारकोळे संदीप कांबळे प्रीतम कांबळे विक्रम कांबळे परमेश्वर कांबळे नागेश कांबळे समीर कांबळे निळकंठ कांबळे मंगेश कांबळे सिद्धार्थ कांबळे जीवक कांबळे सुरज मारकोळे मनोज कांबळे सचिन कांबळे माधव कांबळे करण कांबळे जगन्नाथ कांबळे अण्णाराव कांबळे सतीश कांबळे रामदास कांबळे आदि ची उपस्थिती होती.

*महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.*

अहमदपूर:-
मासूम शेख

भारतरत्न बोधीसत्व परमपूज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री विनायकराव जाधव पाटील , सय्यद साजीदभाई, सोमेश्वर कदम, गोपीनाथराव जोंधळे, विश्वासराव कांबळे, आसिफभाई पठाण, अकबर पठाण, राजाभाऊ खंदाडे ,राहुल शिवपुजे,नाना कदम, परमेश्वर सूर्यवंशी, शंकर मुळे, धीरज भंडे, भगवानराव ससाने, बाबासाहेब वाघमारे, केरबा कांबळे,धम्मानंद कांबळे, संतोष गायकवाड, मिलिंद कांबळे, कैलास गायकवाड, बालाजी थिटे, संभाजी कांबळे, शिवाजीराव गायकवाड, मासूमभाई शेख, बालाजी वाघमारे, प्रभाकर कांबळे, बालाजी तुरेवाले, कुमार गुळवे, राजाराम कांबळे पाटील,शिवाजीराव जंगापल्ले, पिराजी कांबळे, विकास कांबळे आदींनी दीप प्रज्वलित करत पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे सर यांनी केले.तर या कार्यक्रमाचे आभार माजी सरपंच केरबा कांबळे यांनी मानले.

*महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त व क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी होते तर सोनखेड येथील लोकमान्य महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. गोविंद घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. नागराज मुळे , डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. किरण गुट्टे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते

*महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..!*

अहमदपूर:-
मासूम शेख

भारतरत्न बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना अभिवादन करण्यात आले.
सुरुवातीला भारतीय बौध्द महासभा तालूका शाखेच्या वतीने सामूहिक त्रीशरण पंचशिल घेण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांची अभिवादन पर मनोगते संपन्न झाली.
या प्रसंगी उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगारकर,पॅंथरचे नेते संजयभाऊ कांबळे,आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे, वाय.डी.वाघमारे,माजी नगरसेवक शेषेराव ससाणे,
डॉ.ओ.एल.किनगांवकर,
अण्णाराव सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते दयानंद वाघमारे, डॉ.पांडूरंग टोंम्पे, कुलदीप हाके,चंद्रकांत कांबळे,बाबासाहेब लेंडेगावकर,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामानंद मुंडे, माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे, बालाजी थिट्टे,मेघराज गायकवाड, उत्तम लोखंडे, प्राचार्य एम.बी.वाघमारे,राजेंद्र पाटील,शिवनाथ कांबळे, प्रदिप कांबळे,आशाताई कांबळे,राणी गायकवाड,उज्वलाताई बनसोडे,पत्रकार गणेश मुंडे,दिलीप कांबळे,रासू वाघमारे,बी.जी.दुगाणे, गायकवाड,डी.जी.गायकवाड,राहुल तलवार,आदींनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.बालाजी आचार्य यांनी केले.तर या कार्यक्रमाचे आभार संयोजक तथा पुतळा समीतीचे सचिव डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरूण वाघंबर,सचिन बानाटे,अजय भालेराव, शिवाजीराव भालेराव,आकाश पवार,संविधान कदम, रितेश रायभोळे,शरद कांबळे, आदित्य ससाणे,सुमीत ससाणे, दिलीप भालेराव, शिवाजी भालेराव,हिरामण धसवाडीकर, रमेश ससाणे,सुवर्णकेत कांबळे, मिलींद कदम, दिनेश तिगोटे, अजिंक्य गायकवाड,आदींनी पुढाकार घेतला.
या प्रसंगी विविध पक्षाचे सामाजिक,राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती