Home Blog Page 9

*आमदार बाबासाहेब पाटील यांचा वाढदिवस सुखमणी वृध्दाश्रमात साजरा*

अहमदपूर:-
मासूम शेख

येथील सुखमणी वृध्दाश्रमात अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम वृध्दाश्रमातील आज्जी आजोबांच्या हस्ते केक कापण्यात आला.
कार्यक्रमानंतर लागलीच तेथील आज्जी आजोबांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा आज्जी आजोबांनी आस्वाद घेतला व भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिला.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या तालुकाध्यक्षा सुप्रीयाताई चंद्रशेखर भालेराव, नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, कमला नेहरू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दर्शना हेंगणे शिवानी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

*महायुतीचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार.*

अहमदपूर:-
मासूम शेख

नुकत्याच पार पडलेल्या अहमदपूर विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब पाटील यांचा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी नुकताच सत्कार केला.
अटी तटीची वाटणारी अहमदपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या ताकदीमुळे व लाडकी बहीण योजनेमुळे एकतर्फी होऊन महायुतीचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील यांनी बहुमताने विजय मिळवल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी सत्कार केला.
यावेळी लक्ष्मीकांत बनसोडे, प्रकाश ससाने,श्रीकांत बनसोडे, यशवंत केंद्रे यांच्या सह अनेकजण यावेळी उपस्थित होते.

*उदगीरच्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाकडून नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार*

अहमदपूर :-
मासूम शेख

राज्यातील अग्रगण्य असलेल्या उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या व शैक्षणिक क्षेत्रात आपला पॅटर्न निर्माण करणा-या महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरच्या वतीने अहमदपूर – चाकूर विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, महाराष्ट्र एकिकरण समितीचे बीदर जिल्हा सचिव,युवानेते पृथ्वीभैय्या अशोकराव पाटील एकंबेकर, बाबा पाटील तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी अहमदपूर-चाकूर चे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील हे तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ लिपिक डी. पी. सूर्यवंशी तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. संतोष पाटील आदिंची उपस्थिती होती.

*दैनिक साहित्य सम्राटचा दिवाळी अंकाचे मा. आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रकाशन*

अहमदपूर :-
मासूम शेख

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दैनिक साहित्य सम्राटचा दिवाळी 2024 अंकाचे प्रकाशन मा. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक साहित्य सम्राटचे विभागीय संपादक बालाजी पारेकर, महेश अर्बन बँकेचे मॅनेजर अविनाश देशमुख,शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष कैलास क्षीरसागर, युवराज बदने,धसवाडीचे माजी सरपंच दुर्गे नाना,अंकुश क्षीरसागर, कल्याण क्षीरसागर,श्रीहरी क्षीरसागर, प्रल्हाद थडवे, प्रमोद पौळ आदीची उपस्थिती होती.

*महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने लेखक मोहिब कादरी यांचा सत्कार*

अहमदपूर:-
मासूम शेख

येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषदेच्या निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक मोहिब कादरी यांचा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सत्कार करून पुढील साहित्यिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मराठीतील ज्येष्ठ लेखक मोहिब कादरी यांनी मराठी साहित्यामध्ये दिलेल्या विविध वाड्.मयातील कसदार लेखनाची व योगदानाची दखल घेऊन मराठवाडा साहित्य परिषदेच्या निमंत्रक सदस्यपदी त्यांची एकमताने नुकतीच निवड झाली आहे.
या निवडीबद्दल मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी मोहिब कादरी यांचा यथोचित सत्कार करून पुढील साहित्यिक व मसापच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संतसाहित्याचे अभ्यासक प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. पांडुरंग चिलगर, प्रशांत डोंगळीकर, हुसेन शेख , शिवाजी चोपडे यांच्यासह मराठी भाषा व साहित्यावर प्रेम करणारे बहुसंख्य मित्र मंडळी उपस्थित होते