Home Blog Page 122

महाकाली गुफेमध्ये ५०० कोटींचा घोटाळा; सोमय्यांचा वायकरांवर घणाघाती आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर नेत्यांवर आरोपसत्र सुरू झालं. मुंबईतील महाकाली गुंफेमध्ये शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे.

महाकाली गुंफेसाठी ५०० कोटी रुपये अविनाश भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका या बिल्डरला दिले. उद्धव ठाकरेंचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये डावा हात अनिल परब यांचे रिसॉर्ट तुटणार आहे, तर तिसरा हात वायकर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केला आहे. अशी टीका सोमय्यांनी केली. १९९३ च्या ब्लास्टमधील अतिरेक्याचे स्मारक करण्यात हे व्यस्त आहेत. एकाबाजूला स्वतःच्या भ्रष्टाचाराचे स्मारक करायचे आहे, तर दुसऱ्या बाजूला याकूबचे स्मारक देखील करत आहे.

ईश्वर साकडे आणि नरेश सराफ हे १९९३ चे पीडित आहेत. नरेश सराफ यांचा उजवा पाय गेला. आज ३० वर्ष झालेत. हे याकूबचे स्मारक बांधायला निघालेत. तर ईश्वर साकडे यांना गोळी लागली. उद्धव ठाकरे हे बघणार का ? पालिका हे बघणार का ? असा सवालही सोमय्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

खाण्यास गुटखा दिला नाही म्हणून शेजाऱ्यावर चाकूने वार करून हल्लेखोर पसार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेकडील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्रिमूर्तीनगरमध्ये एक घटना घडली आहे. शेजारच्या तरुणाने गुटखा खाण्यास मागितला. मात्र आपण गुटखा खात नाही, आपल्याजवळ गुटखा नाही, असे बोलताच संतप्त झालेल्या तरुणाने त्या शेजाऱ्यावर धारदार चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी करून पसार झाला आहे.

ही घटना डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर तरुणावर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. अजय बलवीर बोथ (वय: २२ वर्षे) राहणार त्रिमूर्तीनगर असे फरार हल्लेखोराचे नाव आहे. तर स्वतंत्रसिंग अवदलाल सिंग (वय: ३० वर्षे) राहणार सिताबाई चाळ, त्रिमूर्तीनगर असे जखमी तक्रारदाराचे नाव आहे. जखमी स्वतंत्रसिंग त्रिमूर्तीनगर मध्ये कुटूंबासह राहून तो सुतारकाम करतो. त्यातच सोमवारी रात्री नऊ वाजता जेवण झाल्यानंतर स्वतंत्रसिंग हा आपल्या घराबाहेर फेऱ्या मारत होता. यावेळी तेथे त्याच्या शेजारीच राहणारा आरोपी अजय बोथ त्याच्यासमोर येऊन त्याने स्वतंत्रसिंग याला थांबवून तुझ्याजवळ गुटखा आहे ना, तो मला खाण्यासाठी दे, अशी मागणी केली. मात्र सिंग याने आपण गुटका खात नाही, आपल्याजवळ गुटखा नाही. गुटक्यावर राज्य शासनाची बंदी असल्याने तो कोठे मिळत नाही, असे अजयला सांगितले त्यामुळे सिंगच्या या बोलण्याचा अजयला राग आला. सिंग हा आपल्याशी खोटे बोलत आहे. त्याच्याजवळ गुटखा असूनही तो आपल्याला मुद्दाम देत नाहीत, असा गैरसमज करत अजयने स्वतः जवळील धारधार चाकूने रागाच्या भरात सिंग याला काही कळण्याच्या आतच त्याच्यावर वार केले व पसार झाला.

पोलिसांकडून फरार आरोपीचा कसून शोध सुरू

चाकू हल्ल्यात सिंग गंभीर रित्या जखमी झाला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. तोपर्यंत आरोपी अजय घटनास्थळावरुन पळून गेला होता. जखमी अवस्थेत सिंग यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी विविध कलमानुसार अजयवर गुन्हा दाखल करुन फरार आरोपी अजयचा कसोशीने शोध सुरू केला आहे.

गुन्हे शाखा घटक-३ कल्याण, घटक-४ उल्हासनगर व खंडणी विरोधक पथकाने घरावर दरोडा घालणाऱ्या टोळीस केले शिताफीने अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विठठलवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीत घरावर दरोडा घालणाऱ्या टोळीस घटक-३ कल्याण, घटक-४ उल्हासनगर व खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर पोलीसांनी जकी कोंडूराम जगयासी राहणार श्रीराम चौक, उल्हासनगर नं.४ च्या फिर्यादीवरून अटक केली आहे.

१) अकबर इमान खान, राहणार संतोषनगर, मुंब्रा , २) आसिफ वारीस अली शेख, राहणार उत्तरशिव, दहिसर, मुंब्रा, ३) शिवसिंग विरसिंग शिकलकर, राहणार अटाळीगांव, आंबिवली, कल्याण, ४) राहुलसिंग बबलूसिंग जुनी, राहणार शेलार चौक, त्रिमूर्तीनगर, पाथरली रोड, डोंबिवली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी जकी जगयासी हे घरी झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी घरामध्ये प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने, डीव्हीआर, ८० हजार रूपये रोख रक्कम असे एकूण १० लाख ४० हजार रूपये किंमतीचे रोख रक्कम दरोडा घालून चोरून नेले बाबत दिलेल्या तक्रारी वरून विठठलवाडी पो.स्टे. गु. रजि.नं. २७८ / २०२२ भादंवि कलम ३९५, ३९७, ४५२ सह भा. ह. कायदा कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ हा गुन्हा दिनांक ३०.०८.२०२२ रोजी दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता विठठलवाडी पो.स्टे सह घटक-३ कल्याण, घटक-४ उल्हासनगर व खंडणी विरोधी पथक यांच्या एकूण ८ पथकाची नेमणूक करण्यात आली होती. नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर पथकाने तपास करून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे ४ आरोपींना अटक करून पुढील तपासकामी विठ्ठलवाडी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

सदर गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांपुढे एक मोठे आव्हान असताना व नमूद गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे व सुगावा नसतांना केवळ तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्याची उकल करण्यात आली. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त जय जीत सिंह, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, लक्ष्मीकांत पाटील सहा पो. आयुक्त शोध-१, सरदार पाटील, सहा. पोलीस आयुक्त शोध-२ अशोक राजपुत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, गुन्हे शाखा, घटक-४ उल्हासनगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण, पोलीस निरीक्षक आनंद रावराणे गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण तसेच गुन्हे शाखा घटक-३, ४ व खंडणी विरोधी पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरी संपत फडोळ पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, महेश कवळे, कैलास इंगळे, पोहवा सुहास म्हात्रे, पोना भगवान हिवरे, पोशि तानाजी पाटील, पोशि देवेंद्र देवरे, सपोनि संजय माळी, पोहवा सचिन साळवी, पोशि शेकडे, पोशि जरक, पोहवा पोटे, पोहवा बोरकर, पोहवा कामत. पोहवा कडू, पोहवा माने, पोहवा किशोर पाटील, पोहवा रमांकात पाटील, पोना सचिन वानखेडे, पोशि चन्ने, सपोउनि केंजळे, पोहवा भावेकर, पोहवा सावंत, पोहवा काटकर, पोहवा सपकाळे पोशि शेरमाने यांनी केली.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) चे माजी प्रमुख रवी नारायण यांना ‘ईडी’ कडून अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी & सीईओ) रवी नारायण यांना कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी ‘ईडी’ने अटक केली आहे.

कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन प्रकरणांचा सीबीआयकडून समांतर तपास सुरू होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चे माजी प्रमुख रवी नारायण यांचा यात सहभाग आहे का? याची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू होती. यानंतर, अखेर असे समजते की ‘ईडी’ने फोन टॅपिंग प्रकरणी रवी नारायण यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत अटक केली आहे.

‘ईडी’ने यापूर्वी कथित फोन टॅपिंग प्रकरणात ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ (एनएसई) चे माजी प्रमुख आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अटक केली होती. या प्रकरणांचा समांतर तपास करणाऱ्या सीबीआयने चित्रा रामकृष्ण यांना ‘को-लोकेशन’ घोटाळ्यात अटक केली होती.

 

अतिवेगाने वाहन चालविल्याने गेल्या साडे तीन वर्षात ३३ हजार ६०४ जणांचा मृत्यू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महामार्गाने वाहन चालताना वेगावर नियंत्रण असणे अत्यावश्यक बाब असते. अनेकदा वेगवान वाहन चालवत असताना नियंत्रण सुटल्याने स्वतःसोबत इतरांचेही जीव धोक्यात घालण्याचा प्रकार घडतो परिणामी भीषण अपघात घडून मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व येते. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या महामार्ग पोलिसांच्या अहवालानुसार जवळपास ३३ हजार ६०४ जणांचा मृत्यू हा ७६ हजार अपघातांमध्ये झाला असून याला सर्वस्वी जबाबदार बाब म्हणजे अतिघाईने व वेगाने वाहन चालविणे होय.

नुकतेच सायरस मिस्त्री यांचे निधन वाहन अपघातात झाले होते, तत्पूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा सुद्धा मृत्यू महामार्गावर अपघातात झाला होता. काही महामार्ग हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असून मुंबई – पुणे, अहमदाबाद – मुंबई, सोलापूर – पुणे, औरंगाबाद – मुंबई यासह औरंगाबाद – अमरावती इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. इथे विशेष बाब म्हणजे काही जागी रस्ते व्यवस्थित नाही परंतु चार ते सहापदरी मार्गावर देखील अपघातांची संख्या लक्षणीय आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वेगाला आवर न घालणे होय. केवळ महामार्गावरच नाही तर शहरी हद्दीत देखील सुसाट वेगाने व कुठलीही पर्वा न करता वाहन चालविणे अनेकांच्या अंगलट आल्याचे चित्र आहे.

वाहन चालविताना नियम न पाळणे, घाईगडबडीने वाहन चालविणे, हेल्मेटचा तसेच सिटबेल्टचा वापर न करणे, स्वतःची लाईन सोडून वाहन चालविणे, ओव्हरटेक करण्याचा आततायी प्रयत्न करणे, अवजड वाहनांच्या दरम्यान सुरक्षित अंतर न राखणे इत्यादी बाबी अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या आहे. काही अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मालाची लोडींग केलेली असते याशिवाय अतिवेग असल्यास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडतो जो स्वतःसोबत इतरांनाही हानी पोहचवतो. मादक पदार्थांचे सेवन करून वाहन चालविल्याने देखील अनेकांचा मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे.