Home Blog Page 13

*गुरुराज माऊली च्या गजरात राष्ट्रसंतांची भक्ती स्थळ ते कपिलाधार पदयात्रा मार्गस्थ*

अहमदपूर:-
मासूम शेख

गुरुराज माऊली शिवलिंग माऊली च्या नामघोषात श्रीक्षेत्र भक्ती स्थळ ते चापोली ते कपिलाधार पदयात्रा भक्ती स्थळावरून हजारो भक्तगणासह मार्गस्थ झाली महापद यात्रेचे 70 वे वर्ष असून राष्ट्रसंतांचे संजीवन समाधी असलेल्या भक्तिसळापासून चापोली चाकूर वडवळ जानवळ कारेपूर पानगाव अंबाजोगाई लोखंडी सावरगाव केज होळ मार्गे श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 15 नोव्हेंबर रोजी पोहोचणार आहे या पदयात्रेत राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे उत्तर अधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज संगणबसप्पा शिवाचार्य महाराज निलंगा मठ शंकर लिंग शिवाचार्य महाराज शिरूरअंत पालकरप भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी राजेश्वर स्वामी कुरळेकर बसवराज स्वामी चिंचोलीकर सहशिवाचार्य सहभागी झाले असून अहमदपूर येथे शिवाजी चौक ते वीरमठ संस्थान पर्यंत मिरवणूक काढण्यात आली भक्ती स्थळ येथे प्रसाद व्यवस्था हैबतपुर तोंडारकर यांच्या वतीने करण्यात आले होते तर वीरमट संस्थान येथे शेटकर महाजन परिवाराच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती या महापद यात्रेत 60 दिंड्या सहभागी झाले असून चापोली व चाकूर या ठिकाणाहून ही अनेक दिंड्या सहभागी होत असतात या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान पदयात्रेचे अध्यक्ष मनमत आप्पा पालापुरे भगवंतराव पाटील चांबर्गीकर निळकंठ बिराजदार संजय ऊसतुर्गे कपिल मल्लीशे हावगी देवने अशोक शेळगावकर यांनी केले आहे

*बदल हवा चेहरा नवा सर्व मतदारसंघात ऐकण्यास मिळत आहे त्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी, लोकांच्या आग्रहाखातरच मी उमेदवार*– *बालाजी पाटील चाकूरकर*

अहमदपूर:-
मासूम शेख

236 अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघात आजी माजी आमदारांनी दहा,दहा वर्षे आमदारकी भोगली आहे परंतु या भागाचा जसा विकास व्हावा तसा विकास झाला नसल्याकारणाने यावेळेस या मतदारसंघातील मतदारांनी बदल हवा चेहरा नवा अशी हाक ऐकायास भेटत असल्याकारणाने मी यावेळेस त्यांच्या सेवेखातरच अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आहे असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार बालाजी पाटील चाकूरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले .
ते पुढे असे म्हणाले की माझी निशाणी ही प्रेशर कुकर आहे कमी वेळेत जेवण तयार होतो तसेच कमी वेळेत विकास करावा यासाठी मला हे प्रेशर कुकर चिन्ह भेटले आहे त्यामुळे 62 वर्षाचा अनुशेष भरून काढण्याची हमी दिली ,या पत्रकार परिषदेस पुढे बोलताना असे म्हणाले की माझ्याबद्दल अपप्रचार करण्यात येत आहे की मी कोणालातरी पाठिंबा देईल परंतु त्या अफवांवर बळी पडू नये ही मतदारसंघातील मतदारांना विनंती केली या पत्रकार परिषदेस अक्षय काडवादे सह बालाजी पाटील चाकूरकर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

*निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे यांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना आवाहन*

अहमदपूर:-
मासूम शेख

236 अहमदपूर विधानसभा लढवीत असलेल्या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की 8 /11 /2024 रोजी वार शुक्रवार सकाळी दहा वाजता ठिकाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अहमदपूर येथे खर्च निरीक्षक प्रशंथ कुमार
काकराला यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांची खर्चाची प्रथम तपासणी होणार आहे
तरी सर्व उमेदवार किंवा त्यांनी नेमणूक केलेल्या प्रतिनिधींनी यांनी खर्च अभिलेखास उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगरकर व नर्सिंग जाधव तसेच सहाय्यक खर्च निरीक्षक बी बी सपकाळ नोडल अधिकारी जी एन गोपवाड यांनी केले आहे.

*महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा*

अहमदपूर :-
मासूम शेख

येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारताचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रत्युष चिलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. तसेच आयर्न लेडी म्हणून जग विख्यात असलेल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनीही अखंड भारतासाठी योगदान दिले असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

*सेवानिवृत्तीच्या काळात कर्मचाऱ्यांनी सामाजिक कामात अग्रेसर रहावे* * *शिक्षण महर्षी डीबी लोहारे गुरुजी यांचे प्रतिपादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या अनेक पिढ्यापासून समाजामध्ये शिक्षकांना अत्यंत मानसन्मान दिला जातो. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचा काळ सामाजिक कार्यात झोकून देऊन कार्य करावे असे आग्रही प्रतिपादन टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डीबी लोहारे गुरुजी यांनी केले.
ते यशवंत एम सी व्ही सी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी मोहन कांबळे यांच्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना शाळेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व भर आहेर देऊन सेवा गौरव कृती सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून दि. 27 रोजी यशवंत विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सहसचिव प्रा.सुनिताताई चवळे- लोहारे, प्राचार्य गजानन शिंदे, मुख्याध्यापक राजेश्वर पारशेटे, उपप्राचार्य प्रा. मुजमील सय्यद, माधव वाघमारे,राम तत्तापूरे, शिवाजी सूर्यवंशी, खय्युम शेख, सत्कारमूर्ती मोहन कांबळे सौ मैना कांबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी सेवानिवृत्त बद्दल शाळेच्या वतीने मोहन कांबळे सौ मैना कांबळे यांचा शाल, श्रीफळ आणि भर आहेर देऊन शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी यावेळी प्रा.रवी ईरफळे, डॉक्टर सुनिता ताई चवळे यांचे मनोगत पर भाषणे झाली,सत्कारमूर्ती मोहन कांबळे यांचे मनोगत पर भाषण झाली.
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र कल्याणी, प्रा. अनिल चवळे, प्रा. बालाजी आचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मुजमील सय्यद यांनी सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार राम तत्तापूरे यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.