Home Blog Page 14

*अहमदपूर चाकुर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार__ आ. बाबासाहेब पाटील*

अहमदपूर:
मासूम शेख

अहमदपूर -चाकुर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.मागील काळामध्ये ट्रामा केअर सेंटर, दोन पशुवैद्यकीय रुग्णालय, नगरपालिकेची तीन मजली इमारतीसह १४६ दुकाने असलेली नगरपालिकेचे संकुल, सांगवी राळगा उजना या आसपासच्या गावातील शेतकऱ्यांसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प, सिंदगी येथे एक हजार एकरावर उभारलेला नवीन तलाव, अहमदपूर चाकूर तालुक्यातील शाळांचे नूतनीकर, मन्याड नदीवरील आठ बांधा-याची उभारणी असे कोट्यावधीचे काम केले असून येणाऱ्या काळात अहमदपूर शहरात १०० बेडचे नवीन रुग्णालय प्रस्तावित असून चाकूर शहरात ट्रामा केअर सेंटर उभारणार आहे. अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आणि वैद्यकीय शिक्षणासह देशभरात कुठे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहीत करणार, मतदारसंघातील चाकूर तालुक्यातील शेळगाव, वाढवणा ते धर्माबाद सिमेंट रोड आणि सांगवी, उजना, गंगाहिप्परगा, खंडाळी अंधोरी, किनगाव व रेणापूर या शंभर किलोमीटर काँक्रीट रस्त्याचे बांधकामाचे काम करणार. अहमदपूर, चाकूर, नळेगाव, किनगाव मधील बस स्थानकाचा पुनर्विकास करून मतदारसंघात विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रिक बसची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. अंतेश्वर धरणातून पाईपलाईन द्वारे मतदार संघातील ३० ते ३२ गावातील शेतकऱ्यांना सिंचन आणि पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता करून आठ हजार हेक्टर वरील जमीन सिंचनाखाली आणणार तसेच शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे नियमित वीज देणार. मतदार संघातील शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी किनगाव मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती भवन, युवकांसाठी क्रीडा अकॅडमी, ओपन जिम स्थापन करणार आहे. मतदार संघातील महिला, स्वयंसेवी गटांना शासकीय योजनांशी जोडून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्याचा यासह वृद्ध, अपंग आणि विधवांसाठी पेन्शन योजना द्वारे पेन्शन मिळून देणार असल्याचेही ते शेवटी म्हणाले, या पत्रकार परिषदेस महायुतीच्या नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

*गुरुराज माऊली च्या गजरात राष्ट्रसंतांची भक्ती स्थळ ते कपिलाधार पदयात्रा मार्गस्थ*

अहमदपूर:-
मासूम शेख

गुरुराज माऊली शिवलिंग माऊली च्या नामघोषात श्रीक्षेत्र भक्ती स्थळ ते चापोली ते कपिलाधार पदयात्रा भक्ती स्थळावरून हजारो भक्तगणासह मार्गस्थ झाली महापद यात्रेचे 70 वे वर्ष असून राष्ट्रसंतांचे संजीवन समाधी असलेल्या भक्तिसळापासून चापोली चाकूर वडवळ जानवळ कारेपूर पानगाव अंबाजोगाई लोखंडी सावरगाव केज होळ मार्गे श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 15 नोव्हेंबर रोजी पोहोचणार आहे या पदयात्रेत राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे उत्तर अधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज संगणबसप्पा शिवाचार्य महाराज निलंगा मठ शंकर लिंग शिवाचार्य महाराज शिरूरअंत पालकरप भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी राजेश्वर स्वामी कुरळेकर बसवराज स्वामी चिंचोलीकर सहशिवाचार्य सहभागी झाले असून अहमदपूर येथे शिवाजी चौक ते वीरमठ संस्थान पर्यंत मिरवणूक काढण्यात आली भक्ती स्थळ येथे प्रसाद व्यवस्था हैबतपुर तोंडारकर यांच्या वतीने करण्यात आले होते तर वीरमट संस्थान येथे शेटकर महाजन परिवाराच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती या महापद यात्रेत 60 दिंड्या सहभागी झाले असून चापोली व चाकूर या ठिकाणाहून ही अनेक दिंड्या सहभागी होत असतात या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान पदयात्रेचे अध्यक्ष मनमत आप्पा पालापुरे भगवंतराव पाटील चांबर्गीकर निळकंठ बिराजदार संजय ऊसतुर्गे कपिल मल्लीशे हावगी देवने अशोक शेळगावकर यांनी केले आहे

*बदल हवा चेहरा नवा सर्व मतदारसंघात ऐकण्यास मिळत आहे त्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी, लोकांच्या आग्रहाखातरच मी उमेदवार*– *बालाजी पाटील चाकूरकर*

अहमदपूर:-
मासूम शेख

236 अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघात आजी माजी आमदारांनी दहा,दहा वर्षे आमदारकी भोगली आहे परंतु या भागाचा जसा विकास व्हावा तसा विकास झाला नसल्याकारणाने यावेळेस या मतदारसंघातील मतदारांनी बदल हवा चेहरा नवा अशी हाक ऐकायास भेटत असल्याकारणाने मी यावेळेस त्यांच्या सेवेखातरच अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आहे असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार बालाजी पाटील चाकूरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले .
ते पुढे असे म्हणाले की माझी निशाणी ही प्रेशर कुकर आहे कमी वेळेत जेवण तयार होतो तसेच कमी वेळेत विकास करावा यासाठी मला हे प्रेशर कुकर चिन्ह भेटले आहे त्यामुळे 62 वर्षाचा अनुशेष भरून काढण्याची हमी दिली ,या पत्रकार परिषदेस पुढे बोलताना असे म्हणाले की माझ्याबद्दल अपप्रचार करण्यात येत आहे की मी कोणालातरी पाठिंबा देईल परंतु त्या अफवांवर बळी पडू नये ही मतदारसंघातील मतदारांना विनंती केली या पत्रकार परिषदेस अक्षय काडवादे सह बालाजी पाटील चाकूरकर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

*निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे यांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना आवाहन*

अहमदपूर:-
मासूम शेख

236 अहमदपूर विधानसभा लढवीत असलेल्या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की 8 /11 /2024 रोजी वार शुक्रवार सकाळी दहा वाजता ठिकाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अहमदपूर येथे खर्च निरीक्षक प्रशंथ कुमार
काकराला यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांची खर्चाची प्रथम तपासणी होणार आहे
तरी सर्व उमेदवार किंवा त्यांनी नेमणूक केलेल्या प्रतिनिधींनी यांनी खर्च अभिलेखास उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगरकर व नर्सिंग जाधव तसेच सहाय्यक खर्च निरीक्षक बी बी सपकाळ नोडल अधिकारी जी एन गोपवाड यांनी केले आहे.

*महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा*

अहमदपूर :-
मासूम शेख

येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारताचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रत्युष चिलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. तसेच आयर्न लेडी म्हणून जग विख्यात असलेल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनीही अखंड भारतासाठी योगदान दिले असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.