Home Blog Page 15

*राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी किलबिलच्या दोन संघाची निवड.*

अहमदपूर:-
मासूम शेख

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विभागीय शालेय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 13/10/2024 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये एकूण 14,17,19 वयोगटातील मुले व मुली अशा एकूण 23 संघांचा समावेश होता. यात किलबिल नॅशनल स्कूल शाळेच्या 14 व 19 वर्षे वयोगट मुले या दोन्ही संघाने आपली चमकदार कामगिरी केली. सदरील दोन्ही संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली . 14 वर्षे वयोगटातील संघामध्ये श्रीरामे कृष्णा, जाजू अमर, सूर्यवंशी व्यंकटेश, जाधव परमेश्वर, जगताप प्रणव, भुरे यश, काजी फहाद, धसवाडीकर राजवीर, पदमपल्ले अखिल या खेळाडू विद्यार्थ्यांचा समावेश होता तर 19 वर्ष वयोगटाखालील संघामध्ये अनुक्रमे सूर्यवंशी ऋषिकेश, हत्ते सुशांत, मुळे सिद्धेश्वर, सूर्यवंशी पवन, सय्यद अलीयान, देशमुख हर्षवर्धन, खोमणे प्रथमेश, शिंदे कल्पेश, मोघेकर संस्कार या खेळाडूंचा समावेश होता. त्याचबरोबर 17 वर्ष वयोगटामध्ये सृष्टी गुट्टे, अपेक्षा बिरादार, श्रद्धा होनराव, कार्तिक गुट्टे या चार विद्यार्थ्यांची निवड चाचणी मार्फत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना शाळेतील क्रीडा शिक्षक अर्शद शेख, कासिम शेख, विशाल सरवदे, निलेश बन यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धरमसिंग शिराळे, पोलीस उपनिरीक्षक असद शेख, कार्यालयीन अधीक्षक सचिन जगताप, राजकुमार कदम यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

*आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांतून ३११ कोटी निधीतून होणार सिमेंट रस्ते!*

अहमदपूर :-
मासूम शेख

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हायब्रीड अन्युटी अंतर्गत अहमदपूर तालुक्यातील अनेक गावात सिमेंट रस्ते बांधणी होणार आहे. या गावांमध्ये सांगवी, उजना, गंगा हिप्परगा, सुमठाणा, वंजारवाडी, किनगाव, कारेपूर आदी गावांचा समावेश असून या गावात या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार असून नागरिकांतून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

याप्रसंगी आ. बाबासाहेब पाटील यांच्यासोबत अध्यक्ष किशोर बापू मुंढे, माजी जि. प. सदस्य त्र्यंबक आबा गुट्टे, दिनकरराव मुंढे, व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव, प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी उपसभापती तुकाराम पाटील, सुनील वाहुळे, ॲड. सादिक शेख, विठ्ठलराव बोडके पाटील, युवराज घोगरे, प्रशांत भाऊ भोसले, रफिक शेख, सतीश नवटक्के, आबा लव्हराळे, मुजफ्फर देशमुख, निजामचाचा शेख, माऊली देवदे, मैनुद्दीन चौधरी, चंद्रकांत गंगथडे, दिलदार शेख, श्रीधर फड, डॉ. माने सर, बाळू घोगरे, भदाडे गुरुजी, मदनराव पलमटे, धम्मानंद कांबळे, धनराज बोडके, बाळू पवार, जितेंद्र बदने, व्यंकटराव बोडके पाटील, सतीशराव कल्याणी, शुभम मुंडे, व्यंकटराव दहिफळे, अखिल शेख, खाजा सय्यद, माऊली बोडके, भरत शिंदे, शिवाजीराव गुट्टे, सायसराव गुट्टे, शादुल शेख, वैजनाथराव मुंढे, आशिष तोगरे, रियाज भाई मौलाना, विठ्ठलराव सिरसाठ, रमेशराव गुट्टे, बाळासाहेब किनकर, सिद्धेश्वर भताने, भास्करराव गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

चिखली गावातून चेअरमन संग्राम चामे, संचालक सतीशराव नवटक्के, शासकीय कंत्राटदार दिनेशराव माने, संभाजी गायकवाड, बालाजी चाटे, अशोकराव चाटे, अविनाश चाटे, माऊली दहिफळे, जनार्दन कराड, उत्तमराव इरले, नागनाथ मुंढे, बाबुराव चाटे, गणेश चाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

ढाळेगाव गावातून सतीशराव क्षीरसागर, ज्ञानोबा ब्रिंगणे, बाबुरावजी कदम, शंकरराव कदम, विष्णू भालापुरे, किरण पाटील, दिनेश सूर्यवंशी, बाबुराव सारोळे, पंडितराव कदम, व्यंकटराव आयनुळे, राजेंद्र चंद्रे, प्रशांत पणे, प्रभातराव कदम आदी उपस्थित होते.

धसवाडी गावातून उत्तमराव देशमुख, उपसरपंच लखन घोडके, अंकुश क्षीरसागर, गंगाधर हेमनर, नागनाथ कदम, नारायण कोपनर, शंकर कांबळे, संजय पांचाळ, पंडित क्षीरसागर, साहेबराव क्षीरसागर, शामराव राठोड, संजय पौळ, श्रीहरी क्षीरसागर, भाऊसाहेब जाधव, किशन क्षीरसागर, सूर्यकांत थडवे, प्रल्हाद थडवे, गंगाधर जाधव, संतोष देशमुख, अंकुश क्षीरसागर, बाबुराव कोळगीर, सोपानराव धावणे आदी उपस्थित होते.

सुमठाणा गावात कार्यक्रमाप्रसंगी आ. पाटील यांनी राहुल नामपल्ले यांच्या अवनी इन्स्टिटयूटला सदिच्छा भेट दिली. यावेळी गावातून सरपंच गंगाराम पोले, ज्ञानोबा पोले, दिगंबर पोले, गुणवंत मुसळे, तुकाराम नामपल्ले, गोविंद मुसळे, बालाजी पोले, कृष्णा मुसळे, सोपान पोले आदी उपस्थित होते.

बेंबडेवाडी गावात आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मनरेगा योजनेअंतर्गत २० लक्ष रुपये पाणंद आणि शेत रस्ते, मूलभूत सुविधा अंतर्गत २० लक्ष रुपयांची विविध विकासकामे, मनरेगा योजनेअंतर्गत १० लक्ष रुपयांचे सिमेंट रोड, मनरेगा योजनेअंतर्गत २० लक्ष रुपयांचे पेवर ब्लॉक, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत २० लाईटचे पोल आदी कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी गावातून तानाजी राजे, उपसरपंच नागेश बेंबडे, विठ्ठलराव बेंबडे, नामदेव सुरकुटे, महेश सुरकुटे, विनोद बेंबडे, गुरुनाथ मुंदवाड, मारुती पाटील, बालाजी मुंदवाड, विठ्ठल रेचवाड, गोपाळ सुरकुटे, पांडुरंग मुंदवाड उपस्थित होते.

खंडाळी गावातून सरपंच अशोक मोरे, बालासाहेब पौळ, विनायक पौळ, अशफाक पटेल, उत्तमराव खोमणे, भगवान पांचाळ, मुरलीधर भुंगे, अंकल खोमणे, केशव माने, अमोल पौळ,सुनील खोमणे, जयदेव लांडगे, लक्ष्मण शिंगडे, योगेश शेळके, नायबराव मिठापुरे, अंगद किरडे, कृष्णा पौळ, संग्राम मीठापुरे, गणेश पौळ आदी उपस्थित होते.

गंगा हिप्परगा गावातून अध्यक्ष बाबुराव देवकत्ते, सरपंच मीनाताई कोमले, संतोष आबासाहेब कदम, अरुणराव कदम, संभाजीराव नागरगोजे, बाजीराव कदम, माधवराव फाजगे, शिवाजी चामवाड, बापूराव देवकांत, लक्ष्मण कोमले, पंडित पांचाळ, निलेश गिरी आदी उपस्थित होते.

उजना गावातून अध्यक्ष निलाकांत कोटलवार, अविनाश भैया जाधव, गुत्तेदार माने, शिवानंद तात्या हिंगणे, शिवाजीराव देशमुख, गोपाळराव कांडणगिरी, संतोषराव नवटक्के, प्रशांत भोसले, तानाजी राजे, नागेश बेंबडे, सावकार, अशोकराव माने, अमोल पौळ, चंद्रकांत गंगथडे, ॲड. सादिक शेख, ईश्वर कोरनोळे, पांडुरंग कांडणगिरे, व्यंकटराव वंगे, फारुक शेख, हबीब शेख, दस्तगीर शेख उपस्थित होते.

सांगवी गावात आ. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मच्छिंद्र सुरनर महाराज भानुदास ढवळे भगवान कांबळे नंदू वाडकर अण्णाराव सुरनर चंद्रकांत सुरनर आदी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळी माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष यशवंतराव बाळू केंद्रे, संचालक पिनू पाटील, अविनाश भैया जाधव, सरपंच राजेश कांबळे, शिवानंद तात्या हेंगणे, शिवाजीराव देशमुख, चंद्रकांत गंगथडे, प्रशांत भोसले, बाळू केंद्रे, किशन पाटील, संतोषराव नवटक्के, तानाजी राजे, खंडाळी सरपंच अशोकराव मोरे, सादिक शेख, व्यंकटराव वंगे, पापा देवकत्ते, गणेश सुरनर, मधुकर पाटील, अप्पाराव सुरनर, विनय ढवळे, गंगाधर सुरनर, भानुदास चवळे, शेख शकोद्दीन, मनोहर कांबळे आदी उपस्थित होते.

*अंशतः अनुदानित शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना २०% अनुदानाचा वाढीव टप्पा जाहीर* हुंकार आंदोलनाला अखेर यश

अहमदपूर/लातूर.
मासूम शेख

महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानावर सुरू असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २०% वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे ७० हजार कुटुंबाचं लक्ष लागल होत.
मंत्रीमंडळ निर्णयाची प्रेस नोट नुकतीच महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली.संबंधित निर्णयाचा शासन निर्णय लवकरच जारी केला जाणार आहे.मुंबई च्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या हुंकार आंदोलना ५६ व्या दिवशी यश आले.१ जून २०२४ पासून अनुदानाचा वाढीव टप्पा अनुज्ञेय राहणार आहे.
प्रेस नोट मध्ये म्हटल्याप्रमाणे शासन निर्णय ६/२/२३ अन्वये विहित निकषांची पूर्तता केलेल्या ८२० प्राथमिक शाळा,३५१३ वर्ग/तुकड्या,व त्यावरील ८६०२ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,१९८४ माध्यमिक शाळा,२३८० वर्ग/तुकड्या,व त्यावरील २४०२८ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,३०४० उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये,३०४३ वर्ग/तुकड्या,अतिरिक्त शाखा व त्यावरील काम करणारे १६९३२ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला आहे.काही प्राथमिक,माध्यमिक शाळा २०%,४०,६०% वेतन अनुदानावर सुरू आहेत तर काही उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालये २०% ,व ४०% वर सुरू आहेत.अनुदानाच्या विविध टप्प्यावर असलेल्या शाळांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात आला आहे.यासाठी होणाऱ्या वार्षिक रु ९३५.४३ कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.१२/०२/२०२१,१५/०२/२०२१ नुसार अपात्र झालेल्या पण ३० दिवसाच्या आत त्रुटी पूर्तता केलेल्या ४०% व ६०% अनुदासाठी पात्र ठरलेल्या ६५१ प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालये व १२८१ तुकड्यावरील ५९९० शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आला आहे.त्या करीत होणाऱ्या रु १०७.१० कोटी आवर्ती खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.तसेच नंतरच्या काळात मूल्यांकनात पात्र ठरलेल्या ,अघोषित शाळांना २०% अनुदानासह घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या सर्व प्रक्रियेत अनुदानास अपात्र ठरणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना स्वयं अर्थसहाय्यीत शाळा(विवक्षित)शाळा म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.निर्णया अंती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल तमाम महाराष्ट्रातील शिक्षकांकडून आभार व्यक्त होत आहेत.शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचेही आभार व्यक्त होत आहेत
अनुदानाचा पुढचा टप्पा वाढवून मिळण्याच्या पाठपुराव्यात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,आ. किशोर दराडे,आ‌‌.किरणराव सरनाईक,आ. ज.मो.अभ्यंकर,आ. विक्रम काळे,माजी आ. श्रीकांत देशपांडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत,अ‍ॅड तुकाराम शिंदे,शिक्षक समन्वय संघाकडून प्रा राहुल कांबळे,के पी पाटील,प्रा.संतोष वाघ,प्रा. अनिल परदेशी,प्रा रत्नाकर माळी,नेहाताई गवळी, बाबासाहेब वाघमारे,समियोद्दिन काजी,संघपाल सोनोने, दिपक वडमारे, भाऊसाहेब खिचडे, कैलास खानसोळे, आशिष इंगळे,आदींसह अनेकांनी आपले योगदान दिले.

चौकट:-

महायुती सरकार ने शिक्षकांची रास्त मागणी ५६ व्या दिवशी पूर्ण केली.त्याबद्दल संवेदनशील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व शिक्षकांचे पालक शिक्षणमंत्री यांनी याविषयाला न्याय दिला
अनेक वर्षे अर्धपोटी काम करणाऱ्या शिक्षकांना पुढचा घास मिळाला. हा विजय आझाद मैदानावर ऊन वारा पावसात बसलेल्या हजारो शिक्षकांच्या एकजुटीचा व शिक्षक समन्वय संघाचा आहे.

बाबासाहेब वाघमारे. (समन्वयक)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून विज्ञानवाद सांगितला – ह.भ.प.डॉ.अनिल महाराज मुंढे

अहमदपूर:-
मासूम शेख

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला सत्याची शिकवण दिली असून, त्यांनी ग्रामगीतेतून विज्ञानवाद सांगितला, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ. प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अनिल मुंढे बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, विदर्भामध्ये जन्माला आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा या दोन महात्म्यांनी महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तन घडविले. हे दोघेही कर्ते सुधारक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला आणि स्वातंत्र्यानंतर समाजातील व्यसनाधिनता आणि अंधश्रद्धा संपावी म्हणून चळवळ हाती घेतली. खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांनी केलेले केलेल्या अमूल्य कार्याचा वारसा त्यांचे शिष्य सुप्रसिद्ध खंजिरी वादक सत्यपाल महाराज आजही चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, ग्रामगीता हा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा आणि अध्यात्माचा पाया आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता ही सत्यावर, न्यायावर आणि वैश्विक बंधुभावावर आधारित असून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामगीतेचे सामुहिक पारायण गावागावातून झाले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनींचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले तर शेवटी डॉ. सतीश ससाणे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयतील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*विविध विकास कामाचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा येथील जिल्हा परिषद मैदान येथे संपन्न*

अहमदपूर:-मासूम शेख

अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण सोहळा येथील जिल्हा परिषद मैदान येथे पार पडला. तसंच आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी संबोधित केलं. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघाचा विकास करून घेऊयात. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी भक्कम उभे रहा, असे आवाहन यावेळी केले

आम्ही राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहा जिल्ह्यांमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम काल पंतप्रधानांच्या हस्ते झाला. माझ्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी, त्यांच्या फायद्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील आहे. लाखांचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला वीज बिल माफी दिली. एक रुपयात पीक विमा दिला. दुधावर प्रतिलिटर ५ ऐवजी ७ रुपयांचा अनुदान देऊ केला. कांद्यावरील निर्यात बंदी हटवली. माझा शेतकरी सुखी तर संपूर्ण देश सुखी राहील. वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत आम्ही देऊ केले आहेत. माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली, ती अतिशय लोकप्रिय ठरली.

महायुतीचं सरकार या न त्या मार्गानं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास ७५ हजार रुपयांचं अनुदान देऊ करत आहे. त्याचा शेतकरी कुटुंबांना नक्कीच फायदा होईल. राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपलं सरकार उपाययोजना आखत आहे. पाणी साठवण आणि सिंचन क्षेत्रात वाढ करण्याबाबतचं धोरण शासनानं आखलेलं आहे. आम्ही प्रत्येक समाजासाठी काम करत आहोत, लढत आहोत. मला जाती-जातीमध्ये सलोखा ठेवायचा आहे. मी अप्पलपोटा नाही, मला महाराष्ट्राला मोठं करायचं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या अंतर्गत लढणाऱ्या उमेदवारांपैकी दहा टक्के उमेदवार हे अल्पसंख्यांक समाजाचे असतील. असेही ते शेवटी म्हणाले मेळाव्यास दोन्ही तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते व मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावली होती, या मेळाव्याची सुरुवात उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.