Home Blog Page 16

*बॉल बॅडमिंटन शालेय जिल्हा स्तरीय स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल शाळेस दुहेरी अजिंक्यपद.*

अहमदपूर:-
मासूम शेख

दिनांक 4 व 5 ऑक्टोबर 2024 रोजी ज्ञानवर्धनी विद्यालय माकनी ता. निलंगा येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल शाळेच्या 19 वर्षे मुले , 14 वर्ष मुले वयोगटातील खेळाडूंनी जिल्ह्यात सर्वप्रथम येत अजिंक्यपद पटकावले. तसेच अहमदपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी सदरील दोन्ही संघाची निवड झाली असून 19 वर्षे संघात- अनुक्रमे सूर्यवंशी ऋषिकेश, हत्ते सुशांक, मुळे सिद्धेश्वर, सूर्यवंशी पवन, सय्यद आलियान, देशमुख हर्षवर्धन, खोमने प्रथमेश, शिंदे कल्पेश, मोघेकर संस्कार.
तसेच 14 वर्षे संघात- श्रीरामे कृष्णा, जाजू अमर, सूर्यवंशी व्यंकटेश, जाधव परमेश्वर, जगताप प्रणव, भूरे यश, काज़ी फहाद, धसवाडीकर राजवीर, पदम्पल्ले अखिल या खेळाडूंचा समावेश होता. या यशाबद्दल संस्थेचे सचिव- ज्ञानोबा भोसले , संघटनेचे सचिव- असद शेख (पोलिसउप-निरिक्षक) शाळेचे प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धरमसिंग , ऑफिस इन्चार्ज- सचिन जगताप यांनी विजयी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विजयी संघास क्रीडा शिक्षक अर्शद शेख, कासिम शेख, विशाल सर आदी क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सकल ओबीसीचा सर्वपक्षीय एकच उमेदवार उभा करणार.

अहमदपूर :- मासूम शेख

सकल ओबीसी, अल्पसंख्याक, भटक्या,दलीत समाजाच्या वतीने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय एकच उमेदवार उभा करण्याचा एक मुखी निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.
अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वराजकीय पक्षातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या अनेक व्यापक बैठका झाल्यानंतर आज अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन सदरील निर्णय जाहीर करण्यात आला.
सकल ओबीसी, अल्पसंख्याक,विमुक्त भटक्या,दलीत समाजाला महायुती किंवा महा विकास आघाडी कडून उमेदवारी जर मिळाली नाही तर महायुती व महा विकास आघाडीतील सकल ओबीसी बांधवांच्या वतिने एकच अपक्ष उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा संकल्प पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.

सदरील पत्रकार परिषदेस माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेश दादा हाके पाटील,डॉ.अशोक सांगवीकर,एन. आर. पाटील, भारत रेड्डी, जिवणकुमार मद्देवाड, अॅड. भारत चामे,सांब महाजन, अशोक काका केंद्रे,त्रंबक आबा गुट्टे, अॅड.माधवराव कोळगावे,सांब महाजन,
चंद्रकांत मद्दे, नितीन रेड्डी,गंगाधर केराळे, ज्ञानोबा बडगिरे,श्रीकांत बनसोडे,मधुकर मुंडे,सिराजोद्दीन जागीरदार,
अशोक नागिमे,डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,बालाजी गुट्टे, अशोक शेळके, माणीक नरवटे , रामानंद मुंडे, हेमंत गुट्टे,यांच्या सह अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वपक्षीय सकल ओबीसी,अल्पसंख्याक,भटक्या,दलीत समाज बांधव मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आभार गोविंद गिरी यांनी मानले.

*राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कपिलधार महा पदयात्रेमुळे विधानसभेच्या निवडणुकीची डेट पुढे ढकलावी* *भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांच्यासह भक्तांची मागणी*

अहमदपूर:-
मासूम शेख

राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली निघालेली महा कपिलधार यात्रा दिनांक सात नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर च्या दरम्यान आहे. या दिंडीमध्ये महाराष्ट्रातील लाखो महिला पुरुष विविध जाती, धर्माचे सदभक्त सहभागी झालेले असतात आणि विधानसभेच्या मतदानाची अंदाजे संभाव्य तारीख दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान घोषित होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सदरची तारीख कपिलधार ची महापद यात्रा झाल्यानंतर करावी अशी आग्रही मागणी भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त मुंबई यांना लातूर जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे यांच्यामार्फत मागणी केली आहे.
अंदाजे विधानसभेच्या निवडणुकीची तारीख आणि कपिलधार महा पदयात्रा यांचा कालावधी एकच दिसतोय सदरची दिंडी राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली गेली पन्नास वर्षापासून काढण्यात येत आहे.
या दिंडीमध्ये लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी हिंगोली औरंगाबाद जालना सह मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आठ लाख ते दहा लाख भाविक भक्त अत्यंत श्रद्धेने सहभागी होतात.
महाराष्ट्र शासन चा आग्रह आहे की 100% मतदान व्हावे पण या महापद यात्रेच्या दरम्यान विधानसभेची तारीख काढली तर या मतदानापासून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील आठ ते दहा लाख लोक या मतदानापासून वंचित राहणार आहेत.
त्यामुळे माननीय साहेबांनी सदरच्या दिंडीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून येणाऱ्या विधानसभेची मतदानाची तारीख बदलावी अशी आग्रही मागणी करण्यात आलेली आहे.
सदरचे निवेदन अहमदपूरच्या उपजिल्हाधिकारी मंजुषाताई लटपटे यांना शिस्ट मंडळांनी दिले.
या निवेदनावर भक्ती स्थळाचे विश्वस्त, मनमत शिवलिंग मिशन, वीरमट संस्थांचे मठाधिपती, परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी, ओम भाऊपूणे, बालाजी पाटील चाकूरकर, प्रतापराव पाटील, अभय मिरकले, लक्ष्मीकांत कासनाळे, दादा उटगे, संदीप चौधरी, राहुल शिवपुजे, राजकुमार कल्याणे, राम तत्तापुरे, एडवोकेट निखिल कासनाळे, प्राध्यापक विश्वंभर स्वामी, ओंकार पाटील, राजू कल्याणी, श्रीकांत उपाध्ये, शाम काबलिया, अमर पाटील यांच्यासह मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत

*आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ट्रॉमा केअर भाग 2 चा भूमिपूजन सोहळा संपन्न.*

अहमदपूर :-
मासूम शेख

येथील ग्रामीण रुग्णालाय ट्रॉमा केअर भाग 2 चा बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करत 3 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आज या कामाचा भूमिपूजन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने करत आहोत असे मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी उद्घाटन पर भाषणात सांगितले आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नागरगोजे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर सुरजमल सिंहाते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख आदीसह मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधत नागरिकांना अधिकाधिक उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा शब्द दिला.
यावेळी ग्रामीण रूग्णालय अधीक्षक,वैद्यकीय अधिकारी,
शाखा अभियंता अधिकारी,व नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे नूर कंट्रक्शन यांचे अक्रम निजाम खान पठाण यांनी स्वागत केले

*आश्रमशाळेत महात्मा गांधी व शास्त्री जयंती साजरी.*

अहमदपूर :-
मासूम शेख

तालुक्यातील सांगवीतांडा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी
साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका महानंदा गोरगे तर याप्रसंगी विनोद गुंठे,विलास पडिले, स्वाती कदम,नागनाथ जवणे,रामचंद्र बाबळसरे, विद्युलत्ता घोगरे
आदींची उपस्थिती होती.
उपस्थितांपैकी नरसिंग सांगवीकर विलास पडिले,पंकज आडे,नागनाथ जवणे,स्वाती कदम, लक्ष्मी राजगे यासह बालचिमुकल्यांनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज नरवटे,अजय मिटकरे,शरद राठोड,अक्षय फुले,बबीता यादव,ज्ञानोबा व्हटमुर्गे,सचिन येचाळे,सिद्धेश्वर राठोड, सुनिता राठोड,सोनू शेळके आदिनी परिश्रम घेतले.