Home Blog Page 17

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सकल ओबीसीचा सर्वपक्षीय एकच उमेदवार उभा करणार.

अहमदपूर :- मासूम शेख

सकल ओबीसी, अल्पसंख्याक, भटक्या,दलीत समाजाच्या वतीने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय एकच उमेदवार उभा करण्याचा एक मुखी निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.
अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वराजकीय पक्षातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या अनेक व्यापक बैठका झाल्यानंतर आज अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन सदरील निर्णय जाहीर करण्यात आला.
सकल ओबीसी, अल्पसंख्याक,विमुक्त भटक्या,दलीत समाजाला महायुती किंवा महा विकास आघाडी कडून उमेदवारी जर मिळाली नाही तर महायुती व महा विकास आघाडीतील सकल ओबीसी बांधवांच्या वतिने एकच अपक्ष उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा संकल्प पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.

सदरील पत्रकार परिषदेस माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेश दादा हाके पाटील,डॉ.अशोक सांगवीकर,एन. आर. पाटील, भारत रेड्डी, जिवणकुमार मद्देवाड, अॅड. भारत चामे,सांब महाजन, अशोक काका केंद्रे,त्रंबक आबा गुट्टे, अॅड.माधवराव कोळगावे,सांब महाजन,
चंद्रकांत मद्दे, नितीन रेड्डी,गंगाधर केराळे, ज्ञानोबा बडगिरे,श्रीकांत बनसोडे,मधुकर मुंडे,सिराजोद्दीन जागीरदार,
अशोक नागिमे,डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,बालाजी गुट्टे, अशोक शेळके, माणीक नरवटे , रामानंद मुंडे, हेमंत गुट्टे,यांच्या सह अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वपक्षीय सकल ओबीसी,अल्पसंख्याक,भटक्या,दलीत समाज बांधव मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आभार गोविंद गिरी यांनी मानले.

*राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कपिलधार महा पदयात्रेमुळे विधानसभेच्या निवडणुकीची डेट पुढे ढकलावी* *भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांच्यासह भक्तांची मागणी*

अहमदपूर:-
मासूम शेख

राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली निघालेली महा कपिलधार यात्रा दिनांक सात नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर च्या दरम्यान आहे. या दिंडीमध्ये महाराष्ट्रातील लाखो महिला पुरुष विविध जाती, धर्माचे सदभक्त सहभागी झालेले असतात आणि विधानसभेच्या मतदानाची अंदाजे संभाव्य तारीख दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान घोषित होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सदरची तारीख कपिलधार ची महापद यात्रा झाल्यानंतर करावी अशी आग्रही मागणी भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त मुंबई यांना लातूर जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे यांच्यामार्फत मागणी केली आहे.
अंदाजे विधानसभेच्या निवडणुकीची तारीख आणि कपिलधार महा पदयात्रा यांचा कालावधी एकच दिसतोय सदरची दिंडी राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली गेली पन्नास वर्षापासून काढण्यात येत आहे.
या दिंडीमध्ये लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी हिंगोली औरंगाबाद जालना सह मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आठ लाख ते दहा लाख भाविक भक्त अत्यंत श्रद्धेने सहभागी होतात.
महाराष्ट्र शासन चा आग्रह आहे की 100% मतदान व्हावे पण या महापद यात्रेच्या दरम्यान विधानसभेची तारीख काढली तर या मतदानापासून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील आठ ते दहा लाख लोक या मतदानापासून वंचित राहणार आहेत.
त्यामुळे माननीय साहेबांनी सदरच्या दिंडीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून येणाऱ्या विधानसभेची मतदानाची तारीख बदलावी अशी आग्रही मागणी करण्यात आलेली आहे.
सदरचे निवेदन अहमदपूरच्या उपजिल्हाधिकारी मंजुषाताई लटपटे यांना शिस्ट मंडळांनी दिले.
या निवेदनावर भक्ती स्थळाचे विश्वस्त, मनमत शिवलिंग मिशन, वीरमट संस्थांचे मठाधिपती, परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी, ओम भाऊपूणे, बालाजी पाटील चाकूरकर, प्रतापराव पाटील, अभय मिरकले, लक्ष्मीकांत कासनाळे, दादा उटगे, संदीप चौधरी, राहुल शिवपुजे, राजकुमार कल्याणे, राम तत्तापुरे, एडवोकेट निखिल कासनाळे, प्राध्यापक विश्वंभर स्वामी, ओंकार पाटील, राजू कल्याणी, श्रीकांत उपाध्ये, शाम काबलिया, अमर पाटील यांच्यासह मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत

*आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ट्रॉमा केअर भाग 2 चा भूमिपूजन सोहळा संपन्न.*

अहमदपूर :-
मासूम शेख

येथील ग्रामीण रुग्णालाय ट्रॉमा केअर भाग 2 चा बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करत 3 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आज या कामाचा भूमिपूजन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने करत आहोत असे मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी उद्घाटन पर भाषणात सांगितले आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नागरगोजे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर सुरजमल सिंहाते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख आदीसह मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधत नागरिकांना अधिकाधिक उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा शब्द दिला.
यावेळी ग्रामीण रूग्णालय अधीक्षक,वैद्यकीय अधिकारी,
शाखा अभियंता अधिकारी,व नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे नूर कंट्रक्शन यांचे अक्रम निजाम खान पठाण यांनी स्वागत केले

*आश्रमशाळेत महात्मा गांधी व शास्त्री जयंती साजरी.*

अहमदपूर :-
मासूम शेख

तालुक्यातील सांगवीतांडा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी
साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका महानंदा गोरगे तर याप्रसंगी विनोद गुंठे,विलास पडिले, स्वाती कदम,नागनाथ जवणे,रामचंद्र बाबळसरे, विद्युलत्ता घोगरे
आदींची उपस्थिती होती.
उपस्थितांपैकी नरसिंग सांगवीकर विलास पडिले,पंकज आडे,नागनाथ जवणे,स्वाती कदम, लक्ष्मी राजगे यासह बालचिमुकल्यांनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज नरवटे,अजय मिटकरे,शरद राठोड,अक्षय फुले,बबीता यादव,ज्ञानोबा व्हटमुर्गे,सचिन येचाळे,सिद्धेश्वर राठोड, सुनिता राठोड,सोनू शेळके आदिनी परिश्रम घेतले.

*जगाला गांधी विचारांची आवश्यकता* प्रा बालाजी आचार्य यांचे प्रतिपादन

अहमदपूर:-
मासूम शेख

महात्मा गांधीजींचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अतुलनीय होते त्यांची सत्य व अहिंसा हा विचार जागतिक शांततेसाठी , मानवता आणि सामाजिक न्यायासाठी उपयुक्त आहेत आजचे जग हे हिंसाचार, स्वैराचार, भ्रष्टाचार यांच्यात अडकले आहे यातून बाहेर पडायचे असेल तर जगाला गांधी विचारांशिवाय दुसरा मार्ग नाही त्याच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन विचारवंत प्रा बालाजी आचार्य यांनी बुधवारी ता २ आक्टोबर रोजी अहमदपूर येथील लोकराजा अध्यापक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात केले
या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रमेश तुरेवाले होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा बालाजी आचार्य ,प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक बालाजी गुळवे , सहशिक्षक गौतम कांबळे, सहशिक्षीका शिवकांता शिंदे प्रा भुजंगराव पाटिल आदि उपस्थित होते यावेळी मान्यवराच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर छात्र अध्यापिका कु साक्षी मोरे हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले
यावेळी छात्र अध्यापक विद्यार्थी विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना प्रा आचार्य पुढे म्हणाले की गांधीजीच्या विचारांचा अवलंब केल्यास देशात राष्ट्रधर्म वाढीस लागेल, धर्माधर्मातील कलह मिटतील व सर्व समाज गुण्या गोविंदाने नांदू शकेल आणि मानवी जीवन सुरक्षित शांतता पूर्ण सुखी समाधानी व परिपूर्ण होईल म्हणून भविष्यातील चांगल्या जगासाठी गाधी विचारांची आवश्यकता आहे राष्ट्रातील सर्वच प्रश्नावर गांधीवाद हाच आशावाद असू शकतो त्यासाठी युवा पिढी, विवेकी आणि बुद्धीवादी लोकामध्ये चर्चा झाली पाहिजे अशी ही भूमिका मांडली या कार्यक्रमात तत्पूर्वी शिवकांता शिंदे , गौतम कांबळे बालाजी गुळवे यांनी हि समायोचित विचार व्यक्त केले अध्यक्षीय समारोप प्राचार्य रमेश तुरेवाले करताना म्हणाले की अहमदपूर शहरात नव्याने सुरू केलेल्या अध्यापक विद्यालयाला चागला प्रतिसाद मिळाला आणि वैचारिक दृष्टिकोनातून जयंती उत्कृष्ठ साजरी झाल्याने खूप आनंद झाला भविष्यात आदर्श समाज निर्मिती साठी कटिबद्ध राहू अशी शपथ घेतली या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन छात्र अध्यापिका कु आयोध्या नरवटे , भाग्यश्री भैयरवाड हिने केले तर शेवटी आभार कु अदित्य गुळवे यांने मांडले कार्यक्रमाला छात्र अध्यापक- अध्यापिका, सहशिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती