Home Blog Page 165

लिमा लुईस यांची खो-खो स्पर्धेत राष्ट्रीय तांत्रिक अधिकारीपदी निवड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारत सरकार आणि भारत सरकारच्‍या ‘युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय’ आणि ‘स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ‘च्‍या संयुक्त विद्यमाने ४ थी ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०२१’ ही स्पर्धा पंचकुला, हरियाणा येथे ४ ते १३ जून, २०२२ या कालावधीत होणार आहे. सदर स्पर्धेत ९ ते १३ जून २०२२ या कालावधीत ताऊ देवी लाल क्रिकेट स्टेडियम, पंचकुला, हरियाणा येथे होणाऱ्या खो खो स्पर्धेसाठी लिमा लुईस यांची राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

लिमा लुईस हे आंतरराष्ट्रीय पंच असून त्यांनी अखिल गोवा खो-खो संघटना स्थापन करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. गोवा खो-खो असोशिवराशनचे ते सध्या उपाध्यक्ष असून त्यांनी चार वर्षे सेक्रेटरी म्हणून सुध्दा यशस्वी कारकीर्द केली आहे. अतिशय मनमिळवू व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख खो-खो क्षेत्रात आहे. पहिली आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धा (१९९९) कोलकत्ता येथे तर दुसरी आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धा (२००६) ढाका, बांगलदेश येथे पार पडली या दोन्ही स्पर्धेत त्यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली आहे.

लिमा लुईस हे भारतीय खो-खो पंच मंडळावर गेली वीस वर्षे काम करीत आहेत. दर चार वर्षांनी होणार्‍या नॅशनल गेम्स स्पर्धेत चार वेळा मुद्रास, इम्फाळ बंगळूरु व पुणे येथील स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. विविध राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत त्यांनी कित्येक वेळा पंच व स्पर्धा पंच प्रमुख म्हणून सुध्दा काम केले आहे.

खेलो इंडिया स्पर्धेत चार पैकी गेल्या वेळी झालेल्या गोहाटी, आसाम येथे पंच व आता होत असलेल्या पंचकुला, हरियाणा येथील स्पर्धेमध्ये ते राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

महाराष्ट्रात दिल्या जाणार्‍या ‘शिवछत्रपती पुरस्कर’ च्या धर्तीवर गोवा सरकारने खो-खो स्पर्धा आयोजनाचा ‘जिवबा दादा केरकर पुरस्कार’ देऊन लिमा लुईस यांचा गौरव केला आहे.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या निवड समित्या जाहीर !!


           (श्री. नागनाथ गजमल, हिंगोली)

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने २०२२-२३ या वर्षासाठी सर्व गटांच्या निवड समित्या जाहीर केले आहेत. या निवड समितींनी फक्त राज्य अजिंक्यपद स्पर्धा निवडीसाठी ग्राह्य न धरता वर्षाच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील विविध खो-खो स्पर्धा पाहून व त्यातील खेळाडूंची प्रगती पाहून व राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत खेळणारे खेळाडू या सर्वांचा विचार करून महाराष्ट्राचे संघ निवडण्याची जबाबदारी या निवड समितींना देण्यात आली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या सहापैकी पाच गटांनी राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवले होते. या सर्व बाबींचा विचार करून वर्षाच्या सुरुवातीलाच या निवड समित्या खालील प्रमाणे जाहीर केल्या आहेत.


 (श्री. प्रशांत देवळेकर, रत्नागिरी)

पुरुष व महिला (खुला गट)

१. श्री नागनाथ गजमल (हिंगोली)
२. श्री प्रशांत देवळेकर (रत्नागिरी)
३. श्री संदेश आंब्रे (मुंबई उपनगर)
४. सौ सुप्रिया गाढवे (उस्मानाबाद)

कुमार व मुली (जूनियर – १८ वर्षाखालील)

१. श्री रमेश नांदेडकर (नांदेड)
२. श्री अनिल रौंदाळ (नंदुरबार)
३. श्री पंढरीनाथ बडगुजर (धुळे)
४. सौ भाग्यश्री फडतरे-पवार (सातारा)


(सौ. शुभांगी कोंडुस्कर-जाधव, मुंबई)

किशोर किशोरी (सब जूनियर – १४ वर्षाखालील)

१. श्री रविराज परमाने (ठाणे)
२. श्री प्रशांत कदम (सातारा)
३. श्री दीपक रावरे (पालघर)
४. सौ शुभांगी कोंडुसकर-जाधव (मुंबई)

वरील समित्या महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे सेक्रेटरी गोविंद शर्मा यांनी जाहीर केल्या आहेत.

 

बोरीवली रेल्वेस्थानकात चाळीस मुंबईकरांनी घेतली तंबाखू सोडण्याची शपथ!

अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलतर्फे तंबाखू छोडो अभियान!

मुंबई: ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ मुंबई व लगतच्या शहरांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटल्स, सेवाभावी संस्था तसेच शाळा कॉलेजेसमध्ये तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात, याच दिनाचे औचित्य साधून मुंबईतील अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या वतीने बोरिवली स्थानकात डॉक्टर व नर्सेस यांनी” तंबाखु छोडो ‘ अभियान राबविले होते. यावेळी रेल्वे स्थानकातील नागरिकांना तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगितले तसेच यावेळी ४० नागरिकांनी तंबाखु सोडण्याची शपथ घेतली.

याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. तन्वी शहा म्हणाल्या, ” मुंबई शहरात अनेक नागरिक दाटीवाटीने राहतात त्यामुळे धूम्रपान अथवा तंबाखुचे व्यसन असणारी असंख्यजण आहेत, कधी कधी त्यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्या कुटुंबातील व मित्रपरिवारातील नकळतपणे व्यसनाच्या आहारी जातात, ३१ मे या दिवशी व्यसन करणाऱ्या नागरिकांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावणे खूपच गरजेचे आहे. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर हे व्यसन सोडायचा प्रण घ्या. जर तुम्ही निर्व्यसनी असाल तर इतरांना हे व्यसन सोडायला प्रवृत्त करा हाच संदेश आमच्या या उपक्रमाद्वारे दिला गेला.

धूम्रपान तसेच तंबाखूचे व्यसन करणाऱ्या नागरिकांना गंभीर आजार होण्याचा व त्यात मृत्यू होण्याचा धोका ५० टक्क्यांपर्यंत जास्त असतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तंबाखूच्या वापरामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, फुफ्फुसाचा जुनाट आजार आणि मधुमेह यासह चार प्रमुख असंसर्गजन्य रोग होऊ शकतात.”

तंबाखूचे सेवन करणे आणि धूम्रपान करणे आरोग्यासाठी खूप हानीकारक आहे. तंबाखूच्या सेवनामुळे आरोग्यास गंभीर धोका उद्भवतो आणि अनेकदा जीवघेणा आजार शरीरात घर करतो. जे लोकं तंबाखूचे सेवन कच्ची तंबाखू, बिडी-सिगारेट, पान मसाला, हुक्का कोणत्याही प्रकारे करत आहेत. त्यांना अशा प्रकारे सेवन केल्यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी समजावणे आणि तंबाखू सोडण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

तंबाखूमुळे शरीरास किती अपाय होतात आणि किती जीवघेणे आजार आपल्याला विळखा घालतात हे वेगळ्याने सांगायची गरज नाही; कर्करोग हा त्यातीलच एक आजार आहे! अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल पुढील १५ दिवसात पश्चिम उपनगरात विविध उपक्रम राबविणार आहेत.

राज्यातील १४ महापालिकांची आज आरक्षण सोडत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत असून, मुंबई महापालिकेसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात येत आहे. तर आता नेत्यांची धाकधूक वाढली असून, मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

मुंबई पालिकेकडून आज मंगळवारी २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडती निघणार आहे. त्याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीविषयी प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. ही सोडत शालेय विद्यार्थ्यांचा हस्ते काढली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून आरक्षणाच्या चिठ्ठ्या उचलण्यात येणार आहेत. सर्वप्रथम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व त्यानंतर महिला आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात आज, मंगळवारी वाढीव नऊ प्रभागांसह एकूण २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी ११ वाजता सोडतीचे आयोजन केले आहे. ही सोडत काढताना गेल्या तीन निवडणुकांत सलग दोन वेळेस पुरुष किंवा महिला आरक्षण असलेल्या प्रभागांतील आरक्षण यंदा बदलले जाईल. या आरक्षण सोडतीवर सर्वच राजकीय पक्ष, नेते, नगरसेवकपदाच्या शर्यतीत असलेल्या सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

आज महाराष्ट्रात पेट्रोल खरेदी बंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. आज मंगळवारी (दि. ३१) रोजी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन यांच्या विविध मागण्यांसाठी पेट्रोल पंपचालकांनी आज देशव्यापी इंधन खरेदी बंद आंदोलन पुकारले आहे.

आज होणार्‍या या आंदोलनात राज्यातील ६ हजार ५०० तर नाशिक जिल्ह्यातील सुमारे ४५० पेट्रोलपंप चालक सहभागी होणार आहेत. केवळ आजच्याच दिवशी पेट्रोलपंप चालकांकडून इंधन खरेदी केली जाणार नाही. ग्राहकांच्या सुविधेकरिता पंपावर साठा उपलब्ध असेपर्यंत त्यांची विक्री जाणार असल्याचे संघटनेमार्फत जाहीर करण्यात आले आहे.