Home Blog Page 18

सांगवीतांडा येथील आश्रमशाळेचे थ्रो बाॅल क्रीडा स्पर्धेत सुयश.

अहमदपूर :- मासूम शेख

  1. तालुक्यातील सांगवीतांडा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी थ्रो बाॅल स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. १४ वर्ष वयोगटातील संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.
    तर याच शाळेतील १७ वर्ष वयोगटातील संघाने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
    महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय थ्रो बाॅल स्पर्धेत विजय मिळवून विभागीय स्पर्धेसाठी १४ वर्ष वयोगटातील संघ यशस्वी ठरला तर १७ वर्ष वयोगटातील संघास जिल्ह्यात दुसरा आला आहे.
    या दोन्ही संघातील खेळाडूंना विजयकुमार कोतवाड,
    ,अजय मिटकरे, पंकज आडे, मुख्याध्यापक स्वाती कदम यांचे मार्गदर्शन लाभले.या त्यांच्या यशाबद्दल यशवंत भटके मागास जनसेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.पांडुरंग टोंपे,सचिव शोभाताई टोंपे, कोषाध्यक्ष डाॅ.अश्विनीताई टोंपे-माळवे, उपाध्यक्ष विनोद गुंठे,डाॅ.अपर्णा टोंपे-सरगर , मुख्याध्यापक महानंदा गोरगे,,विलास पडिले, रामचंद्र जवणे, विद्युलत्ता घोगरे,नरसिंग सांगवीकर,रामचंद्र बाबळसरे,वंदना कदम, मनोज नरवटे,गणेश जाधव, शरद राठोड, बबीता यादव,ज्ञानोबा व्हटमुर्गे,अक्षय फुले,सुनिता राठोड,सिद्धेश्वर राठोड, सचिन येचाळे, लक्ष्मी राजगे,सोनू शेळके,लता सोळंके आदींनी अभिनंदन केले आहे.

*जिल्हास्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत पु अहिल्यादेवीच्या विद्यार्थ्यांचा दबदबा*

अहमदपूर:
मासूम शेख

तालुक्यातील सांगवी सु येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच संत तुकाराम नॅशनल मॉडेल्स स्कूल जलतरण तलाव हरंगुळ , लातूर येथे संपन्न झालेल्या पावसाळी जलतरण स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करत शाळेचा धबधबा निर्माण केला. १४ वर्षे वयोगटात फ्रीस्टाइल पोहण्याच्या स्पर्धेत सूर्यवंशी रोहन दयानंद हा प्रथम आला असून याच वयोगटात बॅक स्ट्रोक 100 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत सूर्यवंशी रोहन दयानंद हाच पुन्हा प्रथम आलेला आहे.१७ वर्षे वयोगटात फ्रीस्टाइल ८०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत चव्हाण बालाजी सुभाष द्वितीय आला असून याच वयोगटात याच स्पर्धेत राठोड अमोल अंगद हा तृतीय आलेला आहे. तर या वयोगटात 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये राठोड अमोल अंगद द्वितीय आला असून 200 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत चव्हाण बालाजी सुभाष प्रथम आलेला आहे. तर १९ वर्षे वयोगटात फ्रीस्टाइल १५०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत चव्हाण रामेश्वर विश्वनाथ प्रथम आला असून 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये चव्हाण रामेश्वर विश्वनाथ हा प्रथम आलेला आहे तर 19 वर्षे वयोगटात ४×१०० रिले स्पर्धेत अहिल्यादेवी चा चमू सर्वप्रथम आला आहे या चमूमध्ये चव्हाण रामेश्वर, चव्हाण बालाजी, राठोड अमोल, चव्हाण प्रदीप आणि चव्हाण आशिष या विद्यार्थ्यांनी सांघिक कार्य करत प्रथम क्रमांक पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्रशिक्षक रेड्डी प्रदीप यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील,संस्थेच्या सचिव तथा भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्य रेखा तरडे- हाके संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, केंद्रप्रमुख रमाकांत खंदारे आदींनी अभिनंदन केले.

*शालेय थ्रो बॉल स्पर्धेत किलबिलचा संघ प्रथम.*

अहमदपूर:- मासूम शेख

24 सप्टेंबर 2024 रोजी महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल शाळेतील संघ सर्वप्रथम आला असून सदरील संघाची नांदेड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या संघात गव्हाळे संकेत, तिरुपती होळकर, साई अवधूत, सिद्धेश्वर मुळे, ढगे सुमित, चैतन्य मुंडे, खजेपवार पार्थ, येरमे वेदांत, कबीर आदर्श, कृष्णकांत तराटे, कुंभारे महेश, नागेश कदम या खेळाडूंचा समावेश आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धरमसिंग, ऑफिस इन्चार्ज – सचिन जगताप यांनी विजय खेळाडूंचे सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विजयी संघास क्रीडा शिक्षक कासिम शेख, विशाल सरवदे,अर्शद शेख, इरफान आकोले, निलेश बन यांचे मार्गदर्शन लाभले

धनेगावचे महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सर्वप्रथम

अहमदपूर:- मासूम शेख
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत देवणी तालुक्यातील धनेगावचे महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सर्वप्रथम राहिले आहे.
त्यामुळे प्राचार्य रामलिंग मुळे यांनी यशवंत विद्यालयास भेट दिली असता त्यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गजानन शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी सह मान्यवर शिक्षक दिसत आहेत.

अहमदपूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतिने प्रा. लक्ष्मण हाके यांना उपोषस्थळीभेट देऊन दिला पाठींबा.

अहमदपूर/मासूम शेख
महाराष्ट्रातील ओबीसींच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरू केलेल्या वडगोद्री ता. आबंड जि. जालना येथील आमरण उपोषणाला भेट देऊन अहमदपूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी जाहीर पाठींबा दिला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील,माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अॅड.भारत भाऊ चामे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी
वडगोद्री ता. आंबड जी. जालना येथे ओबीसी आरक्षण संदर्भात गेल्या एक आठवड्या पासून आमरण उपोषण सुरू असल्याने लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांची उपोषण स्थळी भेट घेऊन अहमदपूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतिने पाठींबा दर्शविला.