Home Blog Page 19

*सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी एडवोकेट अजिंक्य चामे यांची तर सचिवपदी सतीश सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड.*

अहमदपूर:- मासूम शेख
येथील सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्याची व्यापक बैठक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगवीकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 22 रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय शासकीय विश्रामगृहात होऊन त्यात सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते एडवोकेट अजिंक्य भारत चामे यांची तर सचिव पदी सतीश उर्फ पिंटू सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष जयराज तेलंग, वैभव बल्लोरे, सहसचिव ऋषिकेश गुट्टे, कोषाध्यक्ष योगेश शेटकार यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणून बालाजी काडवादे, गंगाधर सूर्यवंशी, अमर पाटील, अक्षय कदम, रवी कदम, संतोष निटूरे, रोहन कंधारकर, पद्माकर पेंढारकर, पांडुरंग लोकरे यांची सर्वांनू मते निवड करण्यात आली.
या बैठकीला माजी आमदार रामभाऊ गुंडिले, मार्गदर्शक ओम भाऊ पुणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, माधव पुणे, पापा आय्या, अभय मिरकले, रवी महाजन, जुगल किशोर शर्मा, सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, विकास महाजन,राजकुमार कल्याणे, दत्ता गोरे, दयानंद पाटील, राजू गाढवे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकुमार उटगे यांनी सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार गोविंद गिरी यांनी तर गेल्या वर्षीच्या अहवालाचे वाचन माजीअध्यक्ष सुभाष गुंडिले यांनी केले .
यावेळी माजी आमदार रामभाऊ गुंडिले, ओम भाऊ पुणे, माधव पुणे यांचे मनोगत पर भाषणे झाली. मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन करण्यात आला.

*अहमदपूरातर मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा*

अहमदपूर दि.17.09.24 मराठवाडा मुक्ती दिनाच्या शासकीय ध्वजारोहण जिल्हा परिषदेचे मैदानावर उपजिल्हाधिकारी सौ मंजुषाताई लटपटे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आला .
यावेळी तहसीलदार उज्वलाताई पांगरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक डी डी भुसनूर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर, माजी नगराध्यक्ष सरस्वती ताई कांबळे, डॉक्टर सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, मधुकर मदने, प्राचार्य गजानन शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन राम तत्तापूरे यांनी तर आभार गौरव चवंडा यांनी मांनले.
सोहळ्याचा शुभारंभ राष्ट्रगीत, त्यानंतर राज्य गीत आणि मराठवाडा गीत सादर करून उपस्थिताना स्वच्छतेची शपथ उपजिल्हाधिकारी सौ मंजुषाताई लटपटे यांनी दिली.
सोहळा यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

उद्या 18 सप्टेंबर रोजी अहमदपूर येथे ओबीसी,दलित अल्पसंख्याक महायल्गार मेळावा

  • अहमदपुर / मासूम शेख

    ओबीसी आरक्षण बच्यावासाठी अहमदपूर येथे

    ओबीसी, अल्पसंख्याक, दलित समाजाचा महायल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सकल ओबीसी अल्पसंख्याक दलित समाजाच्या वतीने उद्या
    18 सप्टेंबर रोजी स. 11 वाजता अहमदपूर शहरातील मेनरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सकल ओबीसी अल्पसंख्याक दलित समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील मेळाव्याला ओबीसी समाजाचे योद्धे प्रा. लक्ष्मण हाके सर , नवनाथ आबा वाघमारे हे संबोधीत करणार आहेत. तरी हजारोंच्या संख्येने सदरील महायल्गार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सकल ओबीसी, अल्पसंख्याक दलित समाज बांधवांच्या वतिने करण्यात आले आहे

आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत जान्हवी जाधवला रौप्य पदक..!!

मासूम शेख, अहमदपूर, प्रतिनिधी: मलेशिया येथील क्वालालंपूर येथे ऑलिंपिक कौन्सिल ऑफ मलेशिया द्वारा आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये, महाराष्ट्राकडून किलबिल नॅशनल स्कूल शाळेची विद्यार्थिनी कु. जान्हवी गणपतराव जाधव व वैभवी प्रशांत माने यांनी धडाकेबाज कामगिरी करत आपल्या देशाला रौप्य पदक मिळवून दिले. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पहिले पदक प्राप्त करून जान्हवीने आपली निवड सार्थ ठरवली आहे.
तिच्या या यशामध्ये छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ता गलाले, संतोष कदम, प्रशांत माने, मोहसिन शेख,आकाश बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धरमसिंग शिराळे कार्यालयीन अधिक्षक सचिन जगताप व क्रीडा विभागाच्या वतीने तीला शुभेच्छा देण्यात आल्या..!!

महायुती सरकारच्या विरोधात मिरा-भाईंदर शहरात काँग्रेसने केले “चिखल फेक” आंदोलन!

भाईंदर, प्रतिनिधी: राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी-स्पर्धा परीक्षेतील घोटाळा, ढासळलेली कायदा व सुव्यस्था, महिलांवर होणारे अत्याचार, हल्ले, खून, दारू पिऊन वाहन चालवून चिरडणाऱ्या श्रीमंत पोरांना वाचवणारी भ्रष्ट शासकीय यंत्रणा आदी ज्वलंत प्रश्न न हाताळता त्यांना पाठीशी घालणारी, आपली सत्ता वाचविण्यासाठी गलिच्छ राजकारणात मग्न असलेल्या भ्रष्ट महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देत मिरारोड येथील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयवर “चिखल फेक” आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला.


काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा, ब्लॉक काँग्रेस, युवक महिला काँग्रेस, पक्षाचे सर्व माजी नगरसेवक, सेलचे पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.