Home Blog Page 33

विविध उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चा एक शैक्षणिक उपक्रम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज दिनांक ६ मे २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे ज्ञानमंदिर विद्यासंकुलाच्या कोतकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली येथे विद्यार्थ्यांना टेबल टेनिस टेबल आणि इतर साहित्य भेट देण्यात आले. सदर भेट ही महासंघाचे हितचिंतक श्री. अभिजित वैद्य ह्यांच्या माध्यमातून वैद्य कुटुंबीय ह्यांच्या तर्फे भालचंद्र वैद्य ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात आली. ह्या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता पाखले, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, कार्यकारिणी सदस्य ऍड.सौ. माधुरी जोशी तसेच विद्यालयाचे शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शाळेतर्फे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे आभार मानले.

लालबावटा रिक्षा युनियनतर्फे शूरवीर आन ठाकूर-मान ठाकूर यांच्या स्मृतीदिनी मोफत जेवण वाटप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील सोनेरी पानावर ठसा उमटवणारे डोंबिवलीतील आन ठाकूर-मान ठाकूर यांच्या २८४ व्या स्मृती दिनानिमित्त ‘लालबावटा रिक्षा युनियन’ आणि ‘प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्ट’ च्या वतीने मोफत जेवणाचे वाटप बुधवारी दुपारी करण्यात आले. आन ठाकूर आणि मान ठाकूर यांचे वंशज जगदीश ठाकूर यांच्या हस्ते मोफत जेवणाचे वाटप करण्यात आले.

यावेळी लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर, मधुकर माळी. कमलाकर पाटील, नितीन पाटील (भोपर गाव), हनुमान पाटील (पडले गाव), जयवंत पाटील (निळजे गाव) इत्यादी ग्रामीण भागातील आगरी समाजाचे सामाजिक कार्यकर्त्यांसह डोंबिवलीतील नागरिक उपस्थित होते.

पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसई किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी ३ मे १७३९ रोजी जुनी डोंबिवली गावातील सुपुत्र शूरवीर आन ठाकूर व मान ठाकूर यांच्यावर किल्ल्याचा बुरुज सुरुंग पेरून उडविण्याची जबाबदारी सोपवली होती. तेव्हा सुरुंगाच्या स्फोटात त्यांना वीरमरण आले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील आन ठाकूर व मान ठाकूर हे दोघे एक सोनेरी पान आहे. याचा डोंबिवलीकरांना अभिमान असल्याचे जगदीश ठाकूर यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. या शूरवीर बंधूंच्या स्मृतीदिनानिमित्त ‘लालबावटा रिक्षा युनियन’ आणि ‘प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्ट’ यांच्यावतीने बुधवारी दुपारी मोफत जेवण जेवणाचे वाटप करण्यात आले.

गुन्हे शाखा घटक – ३ कल्याण कडून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस ०२ तासात केले जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

टिळकनगर पोलीस स्टेशन गुना रजि. नं. ९३ / २०२३ भा.द.वि. कलम ३०२ या गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी नामे रमेश वेलचामी (तेवर) हा गुन्हा केल्यानंतर धारावी मुंबई तसेच मुळगावी तामिळनाडु राज्यात पळून जाणार असल्याची शक्यता गृहित धरुन त्यानुसार नमुद पाहिजे आरोपीचे छायाचित्र प्राप्त करून घटकातील अधिकारी/अमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून त्यांना योग्य सुचना देवुन एक पथक धारावी मुंबई, तसेच दोन पथक कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफार्म परिसरात आरोपीचे शोधार्थ घेण्याकरीता रवाना केले. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोहवा प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव, पोलीस शिपाई गुरुनाथ जरग या पथकाने प्राप्त छायाचित्र, मोबाईल नंबर तसेच तात्रिक विश्लेषणाचे आधारे नमुद संशयीत नामे रमेश व्ही. (रमेश वेलचामी तेवर) वय २८ वर्षे रा. शिवाजी शेलार यांचे घराचे शेजारी, कांचनगाव, खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व, कल्याण यास कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफार्म क्र ०६ चे मुंबई दिशेकडील ब्रिज जवळून पथकातील पोहवा प्रशांत वानखेडे यांनी ताब्यात घेवुन त्याकडे विचारणा करता तो उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याच्यावर संशय बळावला त्यामुळे त्याची अंगझडती घेता रेल्वे गाडी क्र. २२१५७ चैन्नई एग्मोर या जलद गाडीवे ई-तिकीट पीएनआर क्र. ८७०२८५७२९५ हे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण, मानपाडा येथील कार्यालयात आणुन त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याचा मेव्हणा मारीकन्नी रामास्वामी (तेवर) रा. शिवाजी शेलार यांच्या घराचे शेजारी. कांचनगाव, खंबाळपाडा, डोंबिवली, कल्याण यास रागाचे भरात चाकुने भोसकुन / हल्ला करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले असुन रात्री चैन्नई एग्मोर रेल्वेने मुळगावी पळून जाणार असल्याची कबूली दिल्याने त्यास पुढील कारवाई करीता टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवाली करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री. जयजित सिंग, मा. पोलीस सह आयुक्त श्री. दत्तात्रय कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), मा. पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील (गुन्हे), मा. सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे (गुन्हे शोध १) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलीस निरीक्षक शशांक शेळके व त्याचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहा पो उपनिरी संजय माळी, पोहवा प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव पोहवा विकास माळी (मानपाडा पोलीस ठाणे), रमाकांत पाटील, किशोर पाटील, बापुराव जाधव, विश्वास माने, उल्हास खंडारे, बालाजी शिंदे, पोहवा गोरखनाथ पोटे, विलास कडू, पोशि गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, चापोशि राहुल ईशी सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यानी यशस्वीरीत्या केलेली आहे.

 

पुढील तीन महिने दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद ! कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उन्हाळा सुरू झाला असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आठवड्यातून एक दिवस म्हणजेच २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण पॅसिफिक महासागरातील अ‍ॅलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी साठा ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरवण्यासाठी ३२ टक्के तूट येत आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जलस्त्रोतांमध्ये असलेला पाणी पुरवठा लक्षात घेता आणि त्यासोबतच मान्सूनची स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता, ९ मे २०२३ पासून आठवड्यातील दर मंगळवारी २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे कल्याण डोंबिवलीतील बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि पश्चिम, कल्याण ग्रामिण (शहाड, वडवली, आंबिवली आणि टिटवाळा), डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसरात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या पाणी पुरवठा बंदमुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करुन ठेवावा आणि पाणी जपून वापरण्याचं आवाहन कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून करण्यात आलं आहे.

 

घटस्फोटासाठी ६ महिने थांबण्याची गरज नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पती-पत्नीच्या नात्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. नात्यातील दरी संपत नसेल तर असे एकत्र राहण्यात अर्थ नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. म्हणूनच पती-पत्नी मधील दुरावा भरून काढता येत नसल्याच्या आधारावर ६ महिन्यांपूर्वीच घटस्फोट घेता येऊ शकतो, असे न्यायालयाने सांगितले आहे.

न्यायमूर्ती एस के. कौल यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सोमवारी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाला घटनेच्या कलम १४२ नुसार पूर्ण न्याय देण्याचा अधिकार आहे. कलम १४३ अंतर्गत दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून पती-पत्नीच्या परस्पर संमतीने विवाह मोडू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. आता या जोडप्याला संबंध संपवण्यासाठी सहा महिने वाट पाहावी लागणार नाही, असे खंडपीठाने त्यांच्या टिप्पणीत म्हटले आहे.

राज्यघटनेचे कलम १४२ सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही प्रकरणात ‘पूर्ण न्याय’ करण्याच्या त्याच्या आदेशांच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती ए एस.ओका, न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती जे के. महेश्वरी यांचाही समावेश होता. खंडपीठाने म्हटले आहे की, या न्यायालयासाठी आम्ही अशी तरतूद केली आहे की, नात्यातील दुरावा किंवा दरी भरून काढता येत नसल्याच्या आधारे आम्ही विवाहित नातेसंबंध संपुष्टात आणू शकतो. विशेष म्हणजे, घटनेच्या कलम १४२ मधील अधिकारांच्या वापराशी संबंधित अनेक याचिकांवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.